शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : सभापतींना गढूळ पाणी भेट, ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 16:36 IST

तेरवण-मेढे रामघाट धनगरवाडीतील पाणीटंचाईकडे वारंवार लक्ष वेधूनही प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने ग्रामस्थांवर गढूळ पाणी पिण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याने ग्रामस्थांनी गांधीगिरीचा मार्ग अवलंबित चक्क पंचायत समितीच्या सभापतींनाच गढूळ पाणी बाटलीत भरून भेट दिले. या अनोख्या आंदोलनामुळे खडबडून जागे झालेले प्रशासन मंगळवारी उशिरा तेरवण-मेढेत पाहणीसाठी रवाना झाले.

ठळक मुद्देसभापतींना गढूळ पाणी भेट, ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन तेरवण-मेढे धनगरवाडीतील पाणीटंचाईकडे दुर्लक्ष

दोडामार्ग : तेरवण-मेढे रामघाट धनगरवाडीतील पाणीटंचाईकडे वारंवार लक्ष वेधूनही प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने ग्रामस्थांवर गढूळ पाणी पिण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याने ग्रामस्थांनी गांधीगिरीचा मार्ग अवलंबित चक्क पंचायत समितीच्या सभापतींनाच गढूळ पाणी बाटलीत भरून भेट दिले. या अनोख्या आंदोलनामुळे खडबडून जागे झालेले प्रशासन मंगळवारी उशिरा तेरवण-मेढेत पाहणीसाठी रवाना झाले.तेरवण-मेढे ग्रुप ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात रामघाट धनगरवाडी येते. याठिकाणच्या ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची योग्य ती सुविधा नाही. त्यामुळे एका डबक्यातील पाण्याचा आधार पिण्याच्या पाण्यासाठी घ्यावा लागतो. परिणामी या पाणीटंचाईच्या समस्येवर योग्य ती उपाययोजना करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. तेरवण-मेढेचे सरपंच प्रवीण गवस यांनीदेखील पंचायत समिती प्रशासनाचे लक्ष वेधले होते.मात्र, पाणीटंचाईच्या समस्येकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले. रामघाट धनगरवाडीत पिण्याच्या पाण्याची दुसरी कोणतीच सोय नसल्याने ऐन उन्हाळ्यात येथील डबक्यातील पाण्याची पातळी खालावल्याने पाणी गढूळ बनले आहे. हेच पाणी ग्रामस्थ पिण्यासाठी वापरीत आहेत. यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.परिणामी झोपी गेलेल्या प्रशासनाला जाग आणण्यासाठी मंगळवारी ग्रामस्थांनी गांधीगिरी करीत चक्क गढूळ पाणी बाटलीत भरून सभापती नाईक यांना भेट दिले. त्यामुळे पंचायत समिती प्रशासन खडबडून जागे झाले आहे. सभापती गणपत नाईक, तहसीलदार रोहिणी रजपूत व पंचायत समितीचे अधिकारी तातडीने तेरवण-मेढेत प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी रवाना झाले होते. यावेळी ग्रामस्थ महेश काळे, बबन जंगले आदी उपस्थित होते.तडफडून मेल्यावर प्रशासन जागे होणार का?पाणीटंचाईकडे संबंधित विभागाचे वारंवार लक्ष वेधूनही विभागाचे दुर्लक्ष झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी गढूळ पाणी सभापती गणपत नाईक यांना देऊन संताप व्यक्त केला. हे गढूळ पाणी पिऊन ग्रामस्थ तडफडून मेल्यावर प्रशासन जागे होणार का? असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गWaterपाणी