शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग वैद्यकीय महाविद्यालय येत्या वर्षापासून सुरू; ९६६ कोटींचा खर्च शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2020 11:15 IST

Hospital, Sindhudurg, Kolhapur सिंधुदुर्ग येथे होणारे १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येत्या शैक्षणिक वर्षापासून (२०२१-२२) सुरू करण्याचे नियोजन राज्य शासनाने केले आहे.

ठळक मुद्देसिंधुदुर्ग वैद्यकीय महाविद्यालय येत्या वर्षापासून सुरू९६६ कोटींचा खर्च शक्य : जिल्हा रुग्णालय ५०० खाटांचे होणार

विश्र्वास पाटीलकोल्हापूर : सिंधुदुर्ग येथे होणारे १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येत्या शैक्षणिक वर्षापासून (२०२१-२२) सुरू करण्याचे नियोजन राज्य शासनाने केले आहे.

महाविद्यालय व त्यास संलग्नित जिल्हा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून ते ५०० खाटांचे करण्यासाठी आगामी चार ‌वर्षांसाठी ९६६ कोटी रुपये खर्च येऊ शकेल असा अंदाज राज्य सरकारने व्यक्त केला आहे. त्यासंबंधीचा शासन आदेशही सरकारने मंगळवारी (दि. ८) काढला आहे.वैद्यकीय शिक्षण विभागाच्या संचालकांनी आगामी आर्थिक वर्षामध्ये या निधीसाठी आवश्यक ती अर्थसंकल्पीय तरतूद करून घ्यावी असे आदेशात म्हटले आहे. त्यामुळे या महाविद्यालयाच्या स्थापनेच्या हालचालींना वेग येणार आहे. राज्यातील उपलब्ध वैद्यकीय सुविधांचा विचार करता सिंधुदुर्ग जिल्हा तुलनेत वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्यात मागासलेला आहे. त्यामुळे तिथे वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याचा निर्णय झाला आहे. त्यास २४ नोव्हेंबर २०२० च्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाकरिता राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या मानांकनाप्रमाणे जिल्हा रुग्णालय स्थावर जंगम मालमत्तेसह (किमान २० एकर जागेसह) कायमस्वरूपी वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागास नि:शुल्क वापरास हस्तांतरित करण्यात शासनाने मान्यता दिली आहे.खर्चाचा तपशील कोटींमध्ये असा१. इमारत व बांधकाम : ५७२.००२. महाविद्यालयीन अधिकारी व कर्मचारी : ११८.५५३. रुग्णालयीन अधिकारी व कर्मचारी : १०९.१९४. यंत्रसामग्री व उपकरणे : १२० कोटी५. आवर्ती खर्च : ३१.०३६. बाह्यस्रोत खर्च : १५.३१वर्षनिहाय अशी लागेल रक्कमप्रथम वर्ष (२०२१-२२) - ३६६.५८द्वितीय वर्ष - १९३.७४तृतीय वर्ष - २१५.३५चतुर्थ वर्ष - १९०.४१महाविद्यालयासाठी आवश्यक पदेवर्ग १ : ५०वर्ग २ : ५१विद्यावेतनाची पदे : ११८वर्ग ३ नियमित पदे : १८६वर्ग ३ बाह्यस्रोताची पदे : ५८वर्ग४ (कंत्राटी) : ६१एकूण पदे : ५२४ व त्यांवरील खर्च : ११८ कोटी ५५ लाखरुग्णालयासाठी आवश्यक पदेवर्ग१ : ०३वर्ग २ : १७वर्ग ३ नियमित पदे : ५४४वर्ग ३ बाह्यस्रोताने : ४५वर्ग ४ (कंत्राटी) : ४७७एकूण पदे : १०८६ व पगारावरील खर्च : १०९ कोटी १९ लाख

टॅग्स :hospitalहॉस्पिटलsindhudurgसिंधुदुर्गkolhapurकोल्हापूर