शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : आंबा, काजू बागेला आग लागून नुकसान, एक लाखाची हानी, नाटळ-हुमलेटेंब येथील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 16:20 IST

नाटळ-हुमलेटेंबवाडी येथील शेतकरी प्रभाकर भोगले यांच्या तीन एकर बागेला अचानक आग लागल्याने त्यांचे सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले. याबाबतचा पंचनामा तलाठ्यांच्या उपस्थितीत करण्यात आला आहे. भोगले यांनी हुमलेटेंबवाडी येथे तीन एकर जमिनीत काजू कलमे, हापूस आंबा कलमे तसेच इतर जंगली झाडे लावली होती.

ठळक मुद्देआंबा, काजू बागेला आग लागून नुकसानएक लाखाची हानी, नाटळ-हुमलेटेंब येथील घटनावीज कंपनीने तारांची दुरूस्ती करण्याची मागणी

कनेडी : नाटळ-हुमलेटेंबवाडी येथील शेतकरी प्रभाकर भोगले यांच्या तीन एकर बागेला अचानक आग लागल्याने त्यांचे सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले. याबाबतचा पंचनामा तलाठ्यांच्या उपस्थितीत करण्यात आला आहे.भोगले यांनी हुमलेटेंबवाडी येथे तीन एकर जमिनीत काजू कलमे, हापूस आंबा कलमे तसेच इतर जंगली झाडे लावली होती. त्यांच्या बागेला अचानक आग लागल्याने आंबा, काजू व जंगली झाडे जळून खाक झाली आहेत. काही आंबा कलमे ही गेल्यावर्षी लावलेली होती तर काही कलमे ही अनेक वर्षांपूर्वीची होती.

त्या बागेच्या मध्यावरून वीज वितरणच्या वीजवाहिन्या गेल्या आहेत. त्या वाहिन्या काही ठिकाणी एकमेकांच्या जवळ आल्याने वादळात चिकटत असलेल्या दिसत आहेत. प्रथमदर्शनी या वाहिन्या चिकटल्याने शॉर्टसर्किट होऊन आग लागल्याचे दिसत आहे.वीज कंपनीने तारांची दुरूस्ती करण्याची मागणीया आगीला सुरुवात विद्युत तारा चिकटलेल्या ठिकाणीच झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. पावसाळ््यातही याठिकाणच्या विद्युत तारा एकमेकांना चिकटतात आणि याचा परिणाम म्हणून गावाचा वीजपुरवठा खंडित होतो. वीज वितरणच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना याबाबत वारंवार सांगूनही याबाबतची दखल घेतली जात नाही.

दखल वेळीच घेतली असती तर हा प्रसंग घडलाच नसता. याठिकाणी विद्युत तारा या ग्रामस्थांच्या डोक्याला टेकतील एवढ्या खाली आल्या आहेत. त्या पूर्वस्थितीत करण्याची मागणी ग्रामस्थांनी वीज वितरणकडे केली आहे. तसे न झाल्यास वीज वितरणविरूद्ध तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा येथील ग्रामस्थांनी दिला आहे.

 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गfireआग