शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
2
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
3
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
4
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
5
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
6
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
7
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
8
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
9
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
10
मल्याळी असूनही स्वामींचा भक्त आहे जयवंत वाडकरांचा होणारा जावई; म्हणाले, "तो दर महिन्याला..."
11
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
12
Travel: पिकनिक प्लॅन करताय? महाराष्ट्रात 'या' ठिकाणी अनुभवा हॉट एअर बलून राईडचा थरार!
13
घरात पाणी येत नसल्याने दिव्यांग वयोवृद्धाचा टेरेसवरून उडी मारून जीवन संपवण्याचा प्रयत्न
14
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
15
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
16
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
17
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
18
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
19
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
20
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज

सिंधुदुर्ग : महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिलची निवडणूक लढविणार : नार्वेकर, जिल्ह्यातील असोसिएशनचा आपल्याला पाठिंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 18:00 IST

महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलच्या पंचवार्षिक निवडणुकीत मार्च २०१८ मध्ये होऊ घातली आहे. ही निवडणूक सिंधुदुर्ग जिल्हा बार असोसिएशन लढविणार असून कोकणसह जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी अ‍ॅड. संग्राम देसाई यांना उमेदवारी देण्याचे निश्चित करण्यात आले असून तसा ठरावही बैठकीत घेण्यात आला आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातील असोसिएशनचा आपल्याला पाठिंबा महाराष्ट्र आणि गोवा राज्यात बार कौन्सिलचे एकूण १ लाख २३ हजार मतदार निवडणुकीतून २५ उमेदवार निवडले जाणार संग्राम देसाई सिंधुदुर्ग जिल्ह्याचे उमेदवार

सिंधुदुर्गनगरी : महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलच्या पंचवार्षिक निवडणुकीत मार्च २०१८ मध्ये होऊ घातली आहे. ही निवडणूक सिंधुदुर्ग जिल्हा बार असोसिएशन लढविणार असून कोकणसह जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी अ‍ॅड. संग्राम देसाई यांना उमेदवारी देण्याचे निश्चित करण्यात आले असून तसा ठरावही बैठकीत घेण्यात आला आहे.कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी सह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असोसिएशनचा आपल्याला पाठिंबा असल्याची माहिती जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष दिलीप नार्वेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.महाराष्ट्र आणि गोवा राज्यात बार कौन्सिलचे एकूण १ लाख २३ हजार एवढे मतदार आहेत. या निवडणुकीतून २५ उमेदवार निवडले जाणार आहेत. ही निवडणूक आतापर्यंत सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यातील एकाही उमेदवाराने लढविलेली नाही.

सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी येथील उमेदवार देण्याचा व निवडणूक लढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी सर्वानुमते अ‍ॅड. संग्राम देसाई यांना उमेदवारी निश्चित करून भरघोस मतांनी निवडून आणण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती जिल्हा बार असोशिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. दिलीप नार्वेकर यांनी दिली.यावेळी असोसिएशनचे अ‍ॅड. राजेंद्र रावराणे, अ‍ॅड. वीरेश नाईक, अ‍ॅड. संग्राम देसाई, अ‍ॅड. अनीश केसरकर, अ‍ॅड. अमोल सामंत, अ‍ॅड. यतीश खानोलकर, अ‍ॅड. वीरेश राऊळ, अ‍ॅड. गोविंद बांदेकर, अ‍ॅड. सुहास साटम आदि उपस्थित होते.संग्राम देसाई सिंधुदुर्ग जिल्ह्याचे उमेदवारबार कौन्सिल आॅफ गोवा, महाराष्ट्रची निवडणूक मार्च २0१८ मध्ये होऊ घातली आहे. २५ सदस्य पदांसाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी आतापर्यत सिंधुदुर्गातून कोणीही रिंगणात उतरला नाही. मात्र, यावेळी जिल्ह्यासह कोकणचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी सिंधुदुर्गातून उमेदवार देण्याचा निर्णय बार असोसिएशनने घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यातून अ‍ॅड. संग्राम देसाई यांना पाठिंबा देत उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे.र्रल्लँि४स्रँङ्म३ङ्म-02

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गadvocateवकिल