शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : माघी गणेश जयंती कणकवलीत उत्साहात, भक्तिमय वातावरण, श्री गणरायाच्या दर्शनाला भाविकांनी केली गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 16:28 IST

कणकवली येथील श्री सिद्धिविनायक मित्रमंडळाच्यावतीने उपजिल्हा रुग्णालयासमोर भव्य मंडपात आयोजित करण्यात आलेला माघी गणेश जयंती उत्सव भक्तिमय वातावरणात पार पडला. सकाळपासूनच श्री गणरायाच्या दर्शनाला भाविकांनी गर्दी केली होती.

ठळक मुद्देमाघी गणेश जयंती कणकवलीत उत्साहातभक्तिमय वातावरणश्री गणरायाच्या दर्शनाला भाविकांनी केली गर्दी

कणकवली : येथील श्री सिद्धिविनायक मित्रमंडळाच्यावतीने उपजिल्हा रुग्णालयासमोर भव्य मंडपात आयोजित करण्यात आलेला माघी गणेश जयंती उत्सव भक्तिमय वातावरणात पार पडला. सकाळपासूनच श्री गणरायाच्या दर्शनाला भाविकांनी गर्दी केली होती.या माघी गणेश जयंती उत्सवानिमित्त विविध धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. शनिवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास श्री गणेश मूर्तीची आगमन मिरवणूक एस. एम. हायस्कूल ते उपजिल्हा रुग्णालयापर्यंत काढण्यात आली.

रात्री ९ वाजता हरकुळ बुद्रुक येथील श्री कोटेश्वर नवतरुण प्रासादिक भजन मंडळाचे बुवा अभिषेक शिरसाट व नाडण येथील श्री महादेश्वर प्रासादिक भजन मंडळाचे बुवा संदीप पुजारे यांच्यात डबलबारी भजनांचा सामना झाला. या सामन्याला रसिकांचा चांगला प्रतिसाद लाभला.रविवारी गणेश जयंतीदिवशी सकाळी ७ वाजता श्री गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना व पूजा करण्यात आली. त्यानंतर श्री सत्यनारायण महापूजा झाली. दुपारी १ वाजल्यानंतर भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आले. त्यानंतर भजनी मंडळांनी सुश्राव्य भजने सादर केली. रात्री ९ वाजल्यानंतर ओंकार कलामंच सावंतवाडी प्रस्तुत जल्लोष २०१८ हा कार्यक्रम झाला.हा उत्सव चांगल्या पद्धतीने पार पाडण्यासाठी श्री सिद्धिविनायक मित्रमंडळाचे अध्यक्ष नगरसेवक अण्णा कोदे तसेच त्यांच्या सहकाºयांनी विशेष परिश्रम घेतले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गGaneshotsavगणेशोत्सव