शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : मालवणात दोन ठिकाणी पर्यटकांकडून स्थानिकांना मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 19:09 IST

मालवणात पर्यटकांकडून स्थानिकांना मारहाण झाल्याच्या दोन घटना घडल्या. तारकर्ली व किल्ले सिंधुदुर्ग या ठिकाणी झालेल्या या मारहाणीबाबत रात्री उशिरापर्यंत तक्रार नोंद करण्याची कार्यवाही पोलीस ठाण्यात सुरू होती.

ठळक मुद्दे मालवणात दोन ठिकाणी पर्यटकांकडून स्थानिकांना मारहाणपोलीस ठाण्यात तक्रार नोंद करण्याची कार्यवाही सुरू

मालवण : मालवणात पर्यटकांकडून स्थानिकांना मारहाण झाल्याच्या दोन घटना घडल्या. तारकर्ली व किल्ले सिंधुदुर्ग या ठिकाणी झालेल्या या मारहाणीबाबत रात्री उशिरापर्यंत तक्रार नोंद करण्याची कार्यवाही पोलीस ठाण्यात सुरू होती.तारकर्ली रांजेश्वर मंदिरासमोरील पार्किंग परिसरातील स्वच्छतागृहात एक पर्यटक महिला गेली असताना एका स्थानिक महिलेने स्वच्छतागृहाचा दरवाजा उघडल्याच्या रागातून त्या पर्यटक महिलेच्या पतीने त्या स्थानिक महिलेला मारहाण केल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली.

ही मारहाण सोडविण्यास गेलेल्या स्थानिक हॉटेल व्यावसायिक महिला व इतर पर्यटकांनादेखील त्या पर्यटकाने मारहाण करीत एका दुकानातील बरण्या फोडून नुकसान केले. हे प्रकरण सायंकाळी उशिरा मालवण पोलीस स्थानकात पोहोचल्यानंतर याबाबतची कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

तारकर्ली येथे पर्यटकांनी एका हॉटेलचे केलेले नुकसान  

तारकर्ली एमटीडीसीच्यानजीक रांजेश्वर मंदिरासमोरील जागेत गाड्या पार्किंगची व्यवस्था आहे. या पार्किंग जागेतच एक दुकान व स्वच्छतागृहाची व्यवस्था आहे. मालवण तालुक्यातील माळगाव येथे आपल्या नातेवाईकांकडे आलेले मुंबईचे पर्यटक तारकर्ली येथे बुधवारी पर्यटनासाठी आले होते.

सायंकाळी या पर्यटकांमधील एक महिला पार्किंगच्या जागेतील स्वच्छतागृहात गेली होती. दरम्यान, याचवेळी एका स्थानिक महिलेने स्वच्छतागृहाचा दरवाजा उघडला. त्या रागातून त्या पर्यटक महिलेच्या पतीने व अन्य नातेवाईकांनी दरवाजा उघडणाऱ्या स्थानिक महिलेला मारहाण करण्यास सुरुवात केली.

यावेळी त्याठिकाणी आलेल्या अन्य दोघा स्थानिक महिलांनाही मारहाण करण्यात आली. तसेच त्या स्थानिक महिलेच्या हॉटेलमधील बरण्या व अन्य साहित्य फोडून नुकसान करण्यात आले. याबाबत हॉटेल व्यावसायिक व सामाजिक कार्यकर्त्या पूनम चव्हाण यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.कर्मचाऱ्यास मारलेपर्यटन कर मागितल्याच्या कारणावरून सिंधुदुर्ग किल्ल्यात वायरी-भूतनाथ ग्रामपंचायतीमार्फत पर्यटन कर वसूल करणाऱ्या हेमंत वराडकर या कर्मचाऱ्यांला पर्यटकांनी मारहाण केल्याची घटना बुधवारी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास घडली. ही मारहाण सोडविण्यास गेलेल्या कर्मचाऱ्याचे सहकारी मानसी संतोष सावंत व गजानन रोगे यांनाही पर्यटकांनी धक्काबुक्की केली. याबाबत रात्री उशिरापर्यंत मालवण पोलीस स्थानकात तक्रार नोंदविणे व गुन्हा दाखल करण्याबाबत कार्यवाही सुरू होती. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गMalvan beachमालवण समुद्र किनाराMalvan police stationमालवण पोलिस स्टेशनCrimeगुन्हा