कणकवली : तालुक्यातील कलमठ बिडयेवाडी येथे राहत असलेल्या महादेव मल्लाप्पा स्वामी (२१) याने सकाळी साडेआठच्या सुमारास नायलॉनच्या दोरीने गळफास लावून त्यांनी आत्महत्या केली.याबाबतचे अधिक वृत्त असे की, बिडयेवाडी येथे एका चाळीत पाच तरूण राहत होते. यातील चार तरुण प्रशिक्षणासाठी गेले होते. महादेव ने आपल्या पोटात दुखत असल्याचा बहाणा करून तो घरीच राहिला. त्याच्याकडे सापडलेल्या चिठ्ठीत एटीएम कार्ड तसेच त्याचे पासवर्ड लिहिलेले होते. आपली एलआयसी पॉलिसीची रक्कम कोणाच्या नावे करावी असेही त्यांनी चिठ्ठीत लिहिले होते.कर्नाटकातील अनेक तरुण सध्या कणकवली, हळवल येते प्रशिक्षणासाठी येत आहेत. कर्नाटकातील एका कंपनीने साखळी पद्धतीने विक्रीसाठी कर्नाटकातील तरुणांना येथे प्रशिक्षणाचा कार्यक्रम सुरू केला आहे. यासाठी शेकडो तरुण इथे वावरत आहेत. यातीलच महादेव हा एक तरुण होता. याबाबतचा अधिक तपास कणकवली पोलीस करीत आहेत.
सिंधुदुर्ग : कलमठ येथे कर्नाटकच्या तरुणाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 13:35 IST
कणकवली तालुक्यातील कलमठ बिडयेवाडी येथे राहत असलेल्या महादेव मल्लाप्पा स्वामी (२१) याने सकाळी साडेआठच्या सुमारास नायलॉनच्या दोरीने गळफास लावून त्यांनी आत्महत्या केली.
सिंधुदुर्ग : कलमठ येथे कर्नाटकच्या तरुणाची आत्महत्या
ठळक मुद्देकलमठ येथे कर्नाटकच्या तरुणाची आत्महत्याकणकवली पोलीस करीत आहेत अधिक तपास