शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : कणकवली नगरपंचायत निवडणूक सक्षमपणे लढविणार, महिंद्र सावंत यांचे आश्वासन, मुंबई येथील काँग्रेसची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 15:14 IST

कणकवली नगरपंचायत निवडणूक राष्ट्रीय काँग्रेसतर्फे सक्षमपणे लढविण्याचा निर्णय घेण्यात आला असून नगराध्यक्ष तसेच नगरसेवक पदासाठी सर्व प्रभागात उमेदवार उभे करण्यात येणार असल्याची माहिती तालुकाध्यक्ष महिंद्र सावंत यांनी दिली आहे.

ठळक मुद्देकणकवली नगरपंचायत निवडणूक सक्षमपणे लढविणारमहिंद्र सावंत यांचे आश्वासनमुंबई येथील काँग्रेसची बैठक

सिंधुदुर्ग : कणकवली नगरपंचायत निवडणूक राष्ट्रीय काँग्रेसतर्फे सक्षमपणे लढविण्याचा निर्णय घेण्यात आला असून नगराध्यक्ष तसेच नगरसेवक पदासाठी सर्व प्रभागात उमेदवार उभे करण्यात येणार असल्याची माहिती तालुकाध्यक्ष महिंद्र सावंत यांनी दिली आहे.मुंबई-दादर येथील टिळक भवनमध्ये प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला.

यावेळी खासदार हुसेन दलवाई, काँग्रेस प्रवक्ते भाई जगताप, आमदार हुस्नबानू खलिफे, माजी आमदार विजय सावंत, सरचिटणीस राजन भोसले, दत्ता नरे, माजी आमदार सुभाष चव्हाण, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष विकास सावंत, कणकवली तालुकाध्यक्ष महिंद्र सावंत, कणकवली शहर अध्यक्ष विलास कोरगावकर, आतिश जेठे, निखिल गोवेकर, निलेश मालंडकर आदी उपस्थित होते.यावेळी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पक्ष संघटनेबाबत माहिती देण्यात आली. तसेच काँग्रेसची कणकवली तालुका कार्यकारिणी व शहर कार्यकारिणी याबाबतही पूर्ण माहिती देण्यात आली. त्यानंतर कणकवली नगरपंचायत निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली.

यावेळी सर्व जागा लढविण्याचा निर्णय घेण्यात आला. या निवडणुकीसाठी प्रदेश काँग्रेसकडून सवोर्तोपरी सहकार्य करण्यात येईल, असे अशोक चव्हाण यांनी सांगितले.माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. तसेच त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. 

टॅग्स :nagaradhyakshaनगराध्यक्षcongressकाँग्रेसsindhudurgसिंधुदुर्ग