शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : काका कुडाळकरांसह तीन पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, भाजपाकडून कोंडी होत असल्याचे कारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 15:48 IST

भाजपाचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रवक्ते काका कुडाळकर यांच्यासहीत कुडाळ तालुक्यातील भाजपाच्या तीन पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे तडकाफडकी राजीनामे दिल्याने भाजपाच्या गोटात एकच खळबळ उडाली आहे. भाजपाकडून सातत्याने कोंडी होत असल्याच्या कारणातून हे राजीनामे दिले असल्याची चर्चा आहे.

ठळक मुद्देकाका कुडाळकरांसहीत तीन पदाधिकाऱ्यांचे राजीनामे भाजपाकडून कोंडी होत असल्याच्या कारणाची चर्चा

कुडाळ : भाजपाचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रवक्ते काका कुडाळकर यांच्यासहीत कुडाळ तालुक्यातील भाजपाच्या तीन पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे तडकाफडकी राजीनामे दिल्याने भाजपाच्या गोटात एकच खळबळ उडाली आहे. भाजपाकडून सातत्याने कोंडी होत असल्याच्या कारणातून हे राजीनामे दिले असल्याची चर्चा आहे.माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे खंदे समर्थक असलेल्या काका कुडाळकर यांनी राणेंची साथ सोडत माजी आमदार राजन तेली यांच्यासमवेत भाजपात प्रवेश केला होता. कुडाळकर यांनी भाजपात आपल्या काही समर्थकांनाही आणले होते. कुडाळकर यांनी भाजपात येताच पक्ष संघटना वाढीसाठी जोमाने काम करायला सुरुवात केली होती.

विविध उपक्रम, कार्यक्रमही राबविले होते. मात्र त्यांना भाजपाच्या जुन्या पदाधिकाऱ्यांकडून डावलण्याचा प्रयत्न होत होता. त्यामुळे त्यांची कोंडी होत असल्याने भाजपात त्यांची घुसमट होत होती. गेल्या काही महिन्यांपासून तर त्यांना पक्षाच्या बैठकीत, कार्यक्रमाच्यावेळी मानसन्मानापासून दूर ठेवले जात होते. याची ठिणगी आमदार निरंजन डावखरे यांच्या सत्कार कार्यक्रमाच्यावेळी पडली.

कुडाळ तालुका भाजपाच्यावतीने हा कार्यक्रम असतानाही त्यांना बोलू दिले नव्हते. त्यामुळे याबाबत त्यांनी कार्यक्रम संपल्यानंतर जाहीर नाराजी व्यक्त केली होती. राजन तेली यांनाही त्यांनी याबाबत आपली नाराजी बोलून दाखविली होती.या दरम्यान भाजपात घुसमट होत असलेल्या कुडाळकर व त्यांचे समर्थक व भाजपाचे पदाधिकारी सदानंद अणावकर, सर्फराज नाईक, प्रशांत राणे यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांच्याकडे पाठविला आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गBJPभाजपा