सिंधुदुर्गचा कबड्डी संघ रवाना

By Admin | Updated: November 4, 2015 23:56 IST2015-11-04T22:31:11+5:302015-11-04T23:56:53+5:30

राज्यस्तरीय स्पर्धा : खेळाडूंना मान्यवरांच्या शुभेच्छा

Sindhudurg Kabaddi team departs | सिंधुदुर्गचा कबड्डी संघ रवाना

सिंधुदुर्गचा कबड्डी संघ रवाना

सावंतवाडी : बीड येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पुरूष व महिला संघ बुधवारी रवाना झाला आहे. या सर्व खेळाडूंना जिल्ह्यातील विविध मान्यवरांच्यावतीने शुभेच्छा देण्यात आल्या.
या स्पर्धेसाठी जय महाराष्ट्र क्रीडा मंडळ सावंतवाडी यांनी खेळाडूंचे पाच दिवसांचे सराव शिबिर घेतले. या शिबिरातून १२ पुरूष व महिला असे खेळाडू निवडले व सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी याची रितसर घोषणा केली.
पुरूष गटातील कर्णधार अजय जाधव, उपकर्णधार अमित चव्हाण यांच्याबरोबर अनिकेत म्हाडगुत, अमेय अनिकेत पारकर, दीपक चव्हाण, मयूर राणे, दीपक काळे, मकरंद पाटकर, गिरीष चव्हाण, वैभव चव्हाण, नवनीत चव्हाण, संघ व्यवस्थापक प्रथमेश आढाव व प्रशिक्षक यांचा समावेश आहे.तर महिला गटातील खेळाडंूमध्ये कर्णधार अर्चना पाटील, स्रेहा टिळवे, अलिस्टा आल्मेडा, निकिता कुडव, निकिता राऊत, प्रतिज्ञा कोचरेकर, राखी घाडी, मनीषा पुजारी, प्राजक्ता सुभेदार, रूपाली परब, मयुरी चव्हाण, तर प्रशिक्षक संभाजी म्हाडगुत यांचा समावेश आहे.या सर्व खेळाडूंना जय महाराष्ट्र क्रीडा मंडळाचे अध्यक्ष उमाकांत वारंग यांच्याबरोबर मंडळाच्या व सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या. (वार्ताहर)

Web Title: Sindhudurg Kabaddi team departs