शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : पुठ्ठा, टाकाऊ वस्तूंपासून सातवीतील विद्यार्थ्याने साकारला जेसीबी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 14:19 IST

जन्मत:च कलात्मकता अंगी असलेला आणि सतत काहीतरी नवनिर्मितीचा ध्यास घेतलेल्या एडगाव येथील सातवीतील निनाद विनोद रावराणे याने पुठ्ठा आणि टाकाऊ वस्तूंचा वापर करून हुबेहूब जेसीबी साकारला आहे.

ठळक मुद्देपुठ्ठा, टाकाऊ वस्तूंपासून सातवीतील विद्यार्थ्याने साकारला जेसीबीएडगाव येथील १३ वर्षीय निनाद रावराणेच्या नवनिर्मितीला १५ दिवसांनी यश

वैभववाडी : जन्मत:च कलात्मकता अंगी असलेला आणि सतत काहीतरी नवनिर्मितीचा ध्यास घेतलेल्या एडगाव येथील सातवीतील निनाद विनोद रावराणे याने पुठ्ठा आणि टाकाऊ वस्तूंचा वापर करून हुबेहूब जेसीबी साकारला आहे. निनादचा जेसीबी केवळ मॉडेल नसून त्याची खऱ्या जेसीबीप्रमाणे हालचाल होते. पंधरा दिवसांच्या खटाटोपाअंती जेसीबी बनविण्याचा प्रयत्न यशस्वी झाला असून त्याच्या नवनिर्मितीची तालुक्यात चर्चा होऊ लागली आहे.निनाद हा सोनाळीतील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकत आहे. शाळेचा अभ्यास आणि खेळाबरोबरच रिकाम्या वेळेत सतत काहीतरी नवीन करण्यात रममाण असणाऱ्या निनादच्या अंगी कलात्मकता आणि नवनिर्मिती ठासून भरलेली दिसून येते.

त्यामुळेच नवव्या वर्षी गणपतीची अतिशय आकर्षक अशी मूर्ती बनवून त्याने आपल्यातील कौशल्यगुण कुटुंबीयांना दाखवून दिले होते. त्यानंतर किल्ला, डंपर यासारख्या लक्ष वेधून घेणाऱ्या प्रतिकृती व अनेक वस्तू त्याने बनविल्या. आता मात्र त्याने कल्पनाशक्ती व आत्मविश्वासाच्या बळावर चक्क जेसीबी तयार करून आपले वेगळेपण सिद्ध केले आहे.निनादच्या कुटुंबाची पार्श्वभूमी बांधकाम व्यवसायाची आहे. वडील विनोद आणि काका सुनील रावराणे हे दोघे बांधकाम व्यावसायिक असल्याने व्यवसायासाठी आवश्यक जेसीबी, रोलर, ट्रॅक्टर, डंपर यासारखी यंत्रसामग्री त्यांच्याकडे उपलब्ध आहे. त्या यंत्रसामग्रीच्या निरीक्षणातून निनादला जेसीबी बनविण्याची कल्पना सुचली. त्यानंतर त्याने पंधरा दिवस साहित्याची जुळवाजुळव करून हा जेसीबी तयार केला आहे.जेसीबी बनविण्यासाठी त्याने दोन टाकाऊ पुठ्ठे, १४ सिरींज, केरसुणीचे हीर, घरातील जुने दहा स्क्रू, दोन क्रॅप पुठ्ठे अशा जवळपास टाकाऊ वस्तूंचा वापर केला आहे. या वस्तूंचा अत्यंत खुबीने वापर करून अगदी सामान्य जेसीबीला असणारे बकेट, बुम, लोडर, स्टेपिलायझर, चालक केबीनसह हुबेहूब रचना केली आहे.

विशेष म्हणजे रंग आणि घरच्या जेसीबीचा नोंदणी क्रमांकही निनादने जेसीबीला दिला असून खऱ्या जेसीबीप्रमाणेच त्याच्या जेसीबीचे बकेट किंवा लोडरची हालचाल होते. त्याच्या जेसीबीची संपूर्ण हालचाल सिरींज व सलाईनच्या पाईपवर अवलंबून आहे.निनादच्या निर्मितीचे तालुक्यात कुतूहलआपण बनविलेल्या जेसीबीच्या हालचालीचे निनाद येणाऱ्या प्रत्येकाला प्रात्यक्षिक करून दाखवितो. त्यामुळे निनादची नवनिर्मिती असलेला पुठ्ठ्यांचा हालचाल करणारा जेसीबी हा तालुक्यात कुतूहलाचा विषय ठरला असून त्याच्या नवनिर्मितीचे पाहणाऱ्याकडून कौतुक होत आहे. 

टॅग्स :Studentविद्यार्थीsindhudurgसिंधुदुर्ग