शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : जादूटोणा केल्याप्रकरणी पाच संशयितांना न्यायालयीन कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 16:25 IST

जादूटोणा करण्यासाठी सुमारे दोन लाख ३८ हजार रुपये लाटल्याप्रकरणी अटकेत असलेल्या भोंदू बाबा तुकाराम मेस्त्री उर्फ महेश पांचाळ याच्यासह अन्य चार संशयित आरोपींना येथील न्यायालयात हजर केले असता पंधरा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

ठळक मुद्देजादूटोणा केल्याप्रकरणी पाच संशयितांना न्यायालयीन कोठडी चार संशयितांची रवानगी सावंतवाडी कारागृहात

मालवण : जादूटोणा करण्यासाठी सुमारे दोन लाख ३८ हजार रुपये लाटल्याप्रकरणी अटकेत असलेल्या भोंदू बाबा तुकाराम मेस्त्री उर्फ महेश पांचाळ याच्यासह अन्य चार संशयित आरोपींना येथील न्यायालयात हजर केले असता पंधरा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

त्यानुसार सायंकाळी उशिरा पांचाळ व अन्य चार संशयितांची रवानगी सावंतवाडी येथील कारागृहात करण्यात आली आहे. अशी माहिती तपासिक पोलीस निरीक्षक एस. जी. शिंदे यांनी दिली.कौटुंबिक कलह दूर करण्याबरोबर व्यवसायात यश मिळवून देण्यासाठी कृष्णा चव्हाण यांच्यासह अन्य सात जणांची फसवणूक करत दोन लाख ३८ हजार रुपये लाटल्याप्रकरणी पोलिसांनी तुकाराम मेस्त्री ऊर्फ महेश पांचाळ या मुख्य संशयितासह शैलेंद्र मुरलीधर राजाध्यक्ष (५०), श्रीधर गुणाजी सर्पे (६०), विनायक राजाराम राऊळ (६५, तिन्ही रा. कसवण-कणकवली) या तिघांना अटक करण्यात आली होती.पोलिसांनी रविवारी प्रवीण दत्ताराम पांचाळ (रा. चेंबूर-मुंबई) याला मुंबईतून ताब्यात घेतले. त्याने तक्रारदार कृष्णा चव्हाण यांची मुलगी ममता हिच्याकडे पूजाविधी करण्यास मदत केली होती.देवगडचे पोलीस निरीक्षक एस. जी. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जी. व्ही. वारंग, राजन पाटील, मिलिंद परब, मनोज पुजारे यांच्या पथकाने त्याला मुंबईतून ताब्यात घेतले.जादूटोणा प्रकरणातील या सर्व संशयित आरोपींना सोमवारी येथील न्यायालयात हजर केले असता पंधरा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यानुसार त्यांची रवानगी सावंतवाडी येथील कारागृहात करण्यात आली आहे.या प्रकरणातील संशयित आरोपी शैलेंद्र राजाध्यक्ष याच्याकडून दहा हजार रुपये हस्तगत करण्यात आले आहे तर अन्य ठिकाणाहून तुकाराम मेस्त्री याने केलेल्या जादूटोण्याचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे. या प्रकरणी भोंदू बाबा तुकाराम मेस्त्री याच्या कुटुंबियांचीही चौकशी केली जाणार असल्याचे पोलीस निरीक्षक शिंदे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Crimeगुन्हाsindhudurgसिंधुदुर्ग