सिंधुदुर्गनगरी : चले जाव-चले जाव, मोदी-फडणवीस सरकार चले जाव, असल्या सरकारचे करणार काय, खाली डोके वर पाय, एक रुपयाचा कढीपत्ता, सरकार झाले बेपत्ता, वेतन आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे, सिंधुदुर्ग आशा वर्कर्स युनियनचा विजय असो अशा घोषणा देत जिल्ह्यातील शेकडो आशा स्वयंसेविकांनी ओरोस फाटा येथे राष्ट्रीय महामार्ग रोखत जेलभरो आंदोलन छेडले. यावेळी पाच मिनिटे महामार्ग रोखून धरण्यात आला होता. दरम्यान, शेकडो आंदोलनकर्त्यांना यावेळी पोलिसांनी ताब्यात घेतले.राष्ट्रीय आरोग्य अभियान कायम करा, निधीत वाढ करा, आशांना व गटप्रवर्तकांना आरोग्यसेवेत आरोग्यसेविका म्हणून कायम करा, गटप्रवर्तकांना व आशांना दरमहा अठरा हजार रुपये वेतन द्या, शासकीय दवाखान्यांचे खासगीकरण धोरण तत्काळ बंद करा, शासकीय आरोग्य सेवा मजबूत करा या विविध मागण्यांसाठी सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर्स युनियन यांच्यावतीने ९ आॅगस्ट रोजी जेलभरो आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. पण ९ रोजी जिल्हाभर मराठा समाजाचे जेलभरो आंदोलन असल्याने युनियनने मंगळवारी जेलभरो केले. ओरोस फाटा येथील अश्वारूढ शिवाजी पुतळ्याजवळ जिल्ह्यातील शेकडोंनी आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक उपस्थित होत्या.
सिंधुदुर्ग : आशा स्वयंसेविकांचे जेलभरो आंदोलन, मुंबई-गोवा महामार्गावर ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 16:43 IST
घोषणा देत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेकडो आशा स्वयंसेविकांनी ओरोस फाटा येथे राष्ट्रीय महामार्ग रोखत जेलभरो आंदोलन छेडले. यावेळी पाच मिनिटे महामार्ग रोखून धरण्यात आला होता. दरम्यान, शेकडो आंदोलनकर्त्यांना यावेळी पोलिसांनी ताब्यात घेतले.
सिंधुदुर्ग : आशा स्वयंसेविकांचे जेलभरो आंदोलन, मुंबई-गोवा महामार्गावर ठिय्या
ठळक मुद्देआशा स्वयंसेविकांचे जेलभरो आंदोलनमुंबई-गोवा महामार्गावर ठिय्या