शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
4
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
5
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
6
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
7
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
8
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
9
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
10
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
11
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
12
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
13
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
14
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
15
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
16
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
17
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
18
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
19
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

राजकारणात सिंधुदुर्गच रत्नागिरीपेक्षा वरचढ!, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँटे की टक्कर

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: April 30, 2024 17:28 IST

आतापर्यंतच्या तिन्ही निवडणुकांचा विचार करता तिन्ही वेळा सिंधुदुर्गमधीलच उमेदवारांमध्ये लढत

महेश सरनाईकसन २००९ मध्ये मतदारसंघांच्या पुनर्रचनेत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांचा मिळून बनलेल्या लोकसभेच्या (क्रमांक ४६) या तळकोकणातील महत्त्वाच्या मतदारसंघात ७ मे रोजी मतदान होणार आहे. आतापर्यंत या मतदारसंघात तीन वेळा मतदान झाले असून, चौथ्यांदा खासदार निवडण्यासाठी सध्या महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे.

आतापर्यंतच्या तिन्ही निवडणुकांचा विचार करता तिन्ही वेळा सिंधुदुर्गमधीलच उमेदवारांमध्ये ही लढत झाली असून, रत्नागिरीत जास्त मतदान असतानाही राजकीय लढाईत सिंधुदुर्गने रत्नागिरीला मागे टाकल्याचे दिसत आहे. निवडणुकीच्या रिंगणात सध्या या एका वेगळ्याच मुद्द्यावर सर्वत्र राजकीय चर्चा होताना आढळत आहे. रत्नागिरी असो वा सिंधुदुर्ग शेवटी कोकणच. रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन होऊनच सिंधुदुर्गची निर्मिती झाली आहे. त्यामुळे असा मतभेद करण्यात काहीच अर्थ नाही, असे प्रत्युत्तर चर्चा करणाऱ्यांना दिले जात आहे.

सन २००९मध्ये पहिल्या निवडणुकीत शिवसेनेकडून त्यापूर्वी सलग चार निवडणुका जिंकलेले माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्याविरोधात त्यावेळी काँग्रेसमध्ये असलेल्या माजी खासदार नीलेश राणे यांनी निवडणूक लढविली होती. हे दोन्ही उमेदवार सिंधुदुर्ग जिल्ह्यातीलच होते. यात नीलेश राणेंनी बाजी मारत येथे काँग्रेसला यश मिळवून दिले होते.

दुसऱ्या म्हणजे २०१४ आणि तिसऱ्या २०१९च्या निवडणुकांमध्ये विद्यमान खासदार विनायक राऊत यांनी शिवसेनेकडून बाजी मारत माजी खासदार नीलेश राणे यांचा विक्रमी मताधिक्याने पराभव केला होता. २०१४ मध्ये राणे काँग्रेसकडून, तर २०१९ मध्ये स्वाभिमान पक्षाकडून लढले होते. परंतु, राणे आणि राऊत हे दोघेही सिंधुदुर्गचे सुपुत्र असल्याने ही राजकीय लढाई पुन्हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोन भूमिपुत्रांमध्ये झाल्याचे पाहायला मिळाले.

आता लोकसभेची चौथी निवडणूक होत आहे. परंतु, यावेळीही राऊत आणि राणे या दोन्ही सिंधुदुर्ग सुपुत्रांमध्ये राजकीय सामना होणार आहे. फक्त यावेळी नीलेश यांच्याऐवजी नारायण राणे आहेत. शिंदेसेना की भाजप, राणे की सामंत आणि रत्नागिरी की सिंधुदुर्ग असे प्रश्न उमेदवारी जाहीर होईपर्यंत सातत्याने सर्वांनाच पडत होते. परंतु, ज्यावेळी नारायण राणेंना उमेदवारी जाहीर झाली, त्यावेळी या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली. आता राणे निवडून येवो किंवा राऊत, शेवटी सलग चौथ्यांदा सिंधुदुर्ग जिल्ह्यातीलच सुपुत्राला खासदार होण्याचा मान मिळणार आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गratnagiri-sindhudurg-pcरत्नागिरी-सिंधुदुर्गlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Narayan Raneनारायण राणेVinayak Rautविनायक राऊत