शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

सिंधुदुर्ग :  सैनिकांच्या भगिनींची देशप्रेमाची वेडी माया, भंडारी हायस्कूलचा अभिनव उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 14:59 IST

जम्मू काश्मीर, पंजाब, अरुणाचल प्रदेश, राजस्थान, मणिपूर, पश्चिम बंगाल, आसाम तसेच कारवार, नेव्ही डॉक व मुंबई नेव्ही आदी ठिकाणच्या सैनिकांना विद्यार्थिनींनी राख्या पाठविल्या आहेत.

ठळक मुद्देसैनिकांच्या भगिनींची देशप्रेमाची वेडी माया, भंडारी हायस्कूलचा अभिनव उपक्रम विद्यार्थिनींनी बनविल्या तब्बल ५ हजार २५० राख्या

सिंधुदुर्ग : येथील भंडारी कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी सीमेवर भारतभूमीच्या रक्षणासाठी लढणाऱ्या सैनिकांसाठी रक्षाबंधनानिमित्त तब्बल ५ हजार २५० राख्या तयार केल्या आहेत. गेला दीड महिना मेहनत घेऊन विद्यार्थिनींनी सुबक अशा विविध प्रकारच्या राख्या स्वत:च्या हाताने बनविल्या असून या राख्या जम्मू काश्मीर, पंजाब, अरुणाचल प्रदेश, राजस्थान, मणिपूर, पश्चिम बंगाल, आसाम तसेच कारवार, नेव्ही डॉक व मुंबई नेव्ही आदी ठिकाणच्या सैनिकांना पाठविल्या आहेत.या राख्यांचे प्रदर्शन शनिवारी महाविद्यालयाच्या प्रांगणात मांडण्यात आले. यावेळी विद्यार्थी व विद्यार्थिनींनी भारत माता की जय, वंदे मातरम, भारतीय जवानांचा विजय असो, जय जवान, जय किसान अशा घोषणा देऊन महाविद्यालय परिसर दणाणून सोडला.

यावेळी प्राचार्या समिता मुणगेकर, पवन बांदेकर, स्नेहल पराडकर, गणेश सावंत, अपूर्वा देसाई, संपदा कोयंडे, ज्योती सातार्डेकर, एस. डी. वराडकर आदी उपस्थित होते. यानंतर या राख्या पोस्टाच्या माध्यमातून सैनिकांचे तळ असलेल्या ठिकाणांवर पाठविण्यात आल्या.ह्यरक्ताचे नाते असलेला भाऊ फक्त बहिणीचे रक्षण करतो. मात्र आपण भारतमातेचे रक्षण करीत आहात व देशसेवेचे पवित्र कार्य आपणाकडून अविरत घडत राहो ही ईश्वरचरणी प्रार्थनाह्ण असा शुभसंदेशही विद्यार्थिनींनी राख्यांसोबत सैनिकांना पाठविला आहे.

या उपक्रमासाठी पवन बांदेकर यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. यावेळी शंभरहून अधिक राख्या बनविणाऱ्या १३ विद्यार्थिनींना भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. या उपक्रमाबद्दल प्राचार्या समिता मुणगेकर यांनी विद्यार्थिनींचे व शिक्षकांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.सैनिकांसाठी राख्या बनविण्यासाठी विद्यार्थिनींचे गट तयार करण्यात आले. गतवर्षीप्रमाणे यावर्षीही सर्व विद्यार्थिनींनी मिळून विक्रमी अशा तब्बल ५ हजार २५० राख्या बनविल्या.

यामध्ये शालू रोशन कुमावत (१०००), नेहा जगदीश तिरोडकर (७००), श्वेता दिनेश बिरमोळे (३२०) या विद्यार्थिनींनी सर्वाधिक राख्या बनविल्या. बांदेकर यांनी या उपक्रमाची माहिती विशद केली. तसेच सहभागी विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी व विद्यार्थी उपस्थित होते. 

टॅग्स :Rakhiराखीsindhudurgसिंधुदुर्ग