शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : कणकवलीत २३ फेब्रुवारीपासून कबड्डीचा थरार, संदेश पारकर यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 18:09 IST

सिंधुदुर्ग जिल्ह्याबरोबरच इतर भागातील खेळाडूंच्या कला गुणाना वाव देण्यासाठी येथील कुणाल बागवे कला, क्रीड़ा मंडळाच्यावतीने गेली अकरा वर्षे भव्य कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात येते. यावर्षी ही स्पर्धा २३ ते २५ फेब्रुवारी या कालावधीत येथील विद्यामंदिरच्या पटांगणावर १६ नामवंत निमंत्रित संघांच्या उपस्थितीत प्रकाश झोतात होणार असल्याची माहिती युवा नेते संदेश पारकर यांनी येथे दिली.

ठळक मुद्देकुणाल बागवे चषक कबड्डी स्पर्धेचे आयोजन १६ नामवंत निमंत्रित संघांच्या उपस्थितीत प्रकाश झोतात स्पर्धा

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्याबरोबरच इतर भागातील खेळाडूंच्या कला गुणाना वाव देण्यासाठी येथील कुणाल बागवे कला, क्रीड़ा मंडळाच्यावतीने गेली अकरा वर्षे भव्य कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात येते. यावर्षी ही स्पर्धा २३ ते २५ फेब्रुवारी या कालावधीत येथील विद्यामंदिरच्या पटांगणावर १६ नामवंत निमंत्रित संघांच्या उपस्थितीत प्रकाश झोतात होणार असल्याची माहिती युवा नेते संदेश पारकर यांनी येथे दिली.कणकवली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी स्पर्धा आयोजन समिती अध्यक्ष रूपेश नार्वेकर, हरीश निखार्गे, महैंद्र मराठे, शशांक बोर्डवेकर, परेश बागवे, निनाद दीपनाईक, संतोष पूजारे आदी मंडळाचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.संदेश पारकर म्हणाले, कुणाल बागवे, अमित मुद्राळे, प्रमोद परब, सदानंद सावंत यांच्या स्मृती प्रित्यर्थ गेली अकरा वर्षे त्यांची मित्रमंडळी एकत्र येऊन या भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन करीत आहेत. कुणाल बागवे मित्रमंडळ क्रीड़ा, सामाजिक,सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात अनेक उपक्रम राबवित असते. कणकवली बरोबरच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव या मंडळाने राज्य तसेच देशपातळीवर नेण्यासाठी सातत्याने प्रयत्न सूरु ठेवले आहेत.दरवर्षी प्रमाणेच यावर्षी ' कुणाल चषक २०१८ ' या कबड्डी स्पर्धेचे आयोजन हे मंडळ करीत असून तिन दिवस कबड्डीचा थरार कणकवलीत क्रीड़ा रसिकाना पहायला मिळणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशनच्या मान्यतेने ही स्पर्धा होणार आहे. या ठिकाणी प्रेक्षकांसाठी ख़ास गॅलरीची व्यवस्था करण्यात येणार आहे. तर महिलांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्थाही असणार आहे. त्याचबरोबर क्रीड़ा रसिकांसाठी लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे.२३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धेचे उदघाट्न होईल. तर २५  फेब्रुवारी रोजी रात्री उशिरा पारितोषिक वितरण करण्यात येईल. स्पर्धेतील विजेत्या संघास रोख रूपये ४१ हजार व कुणाल चषक, उपविजेत्या संघास रोख रूपये ३१ हजार व चषक तर उपांत्य फेरितील पराभूत दोन संघाना प्रत्येकी रोख रूपये १०  हजार व चषक देवून गौरविण्यात येणार आहे.सर्वोत्कृष्ट खेळाडू रोख रूपये ४००० , उत्कृष्ट पकड़ रोख रूपये ३०००, उत्कृष्ट चढ़ाई रोख रूपये ३००० तसेच इतरही आकर्षक बक्षीसे दिली जाणार आहे. तसेच या सर्व विजेत्यांना आकर्षक चषक दिला जाणार आहे. लाल मातीतील या खेळाच्या महाउत्सवात सिंधुदूर्गातील क्रीड़ा रसिकानी सहभागी व्हावे असे आवहनही संदेश पारकर यांनी यावेळी केले.

मंडळाची उत्कृष्ट कामगीरी !कुणाल बागवे कला, क्रीड़ा मंडळाला महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचा सातत्यपूर्ण कबड्डी स्पर्धेचे आयोजक संस्था २०१५  चा पुरस्कार मिळाला आहे. तसेच सिंधु भूमि फाऊंडेशनचा ' सर्वोत्कृष्ट क्रीड़ा मंडळ' हा पुरकारही मिळाला आहे. या मंडळाने केलेल्या उत्कृष्ट कामगिरिची ही पोचपावती आहे. असे यावेळी संदेश पारकर यांनी सांगितले.

टॅग्स :Sandesh Parkarसंदेश पारकरSportsक्रीडाsindhudurgसिंधुदुर्ग