शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू, चौकुळमधील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 18:55 IST

चौकुळ-माळवाडी येथील पापडीचे पूल येथे आपले मित्र व वडिलांसोबत मासे पकडण्यासाठी गेलेल्या साई शंकर गावडे (१८, मूळ रा. चौकुळ-गावडेवाडी) या युवकाचा बुडून मृत्यू झाला. मंगळवारी सायंकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

ठळक मुद्देयुवकाचा पाण्यात बुडून मृत्यू, चौकुळमधील घटना मासे पकडण्यासाठी उतरला होता नदीत

आंबोली : चौकुळ-माळवाडी येथील पापडीचे पूल येथे आपले मित्र व वडिलांसोबत मासे पकडण्यासाठी गेलेल्या साई शंकर गावडे (१८, मूळ रा. चौकुळ-गावडेवाडी) या युवकाचा बुडून मृत्यू झाला. मंगळवारी सायंकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.साई हा आपले वडील शंकर गावडे, भाऊ सोनू गावडे, रुपेश गावडे यांच्यासमवेत मंगळवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास माळवाडी पापडी पूल येथे मासे पकडण्यासाठी गेला होता. त्यावेळी अंधार पडू लागला होता.

साई हा जाळे घेऊन पाण्यात उतरला, तर त्याचे भाऊ आणि वडील वरच राहिले. पाण्याचा अंदाज न आल्याने तो गटांगळ््या खाऊ लागला आणि पाण्यात बुडाला. भाऊ आणि वडिलांनी आरडाओरड करीत त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचे प्रयत्न व्यर्थ ठरले.पोलीस पाटील प्रशांत गावडे यांनी याबाबत साडेसात वाजण्याच्या सुमारास आंबोली पोलीस दूरक्षेत्रात माहिती दिली. त्यानंतर आंबोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र अंधारामुळे शोधमोहिमेत व्यत्यय येत असल्याने मोहीम थांबविण्यात आली होती.बुधवारी सकाळपासूनच शोधमोहीम हाती घेण्यात आली. सकाळी सातच्या सुमारास साई याचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला.

वडिलांची कोल्हापुरात वडापावची गाडीसाई हा चौकुळ-गावडेवाडी येथील असून, त्याच्या वडिलांची कोल्हापूर येथे वडापावची गाडी आहे. तो आपल्या वडिलांसोबत तेथेच राहत होता. यावर्षी त्याने बारावीची परीक्षा दिली होती. त्याच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

बुधवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास त्याचा मृतदेह आंबोली प्राथमिक आरोग्यकेंद्र्रात आणून शवविच्छेदन करण्यात आले. याबाबतचा अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विश्वास सावंत हे करीत आहेत. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गAccidentअपघातWaterपाणी