शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

सिंधुदुर्ग : माणुसकी, नैतिकतेच्या चौकटीतून खुर्चीला न्याय द्या : नीतेश राणे, वैभववाडी आमसभेत अपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 15:49 IST

जनतेच्या प्रश्नांना तांत्रिक उत्तरे देणे म्हणजे लोकप्रतिनिधी आणि प्रशासन पर्यायाने लोकशाहीवरील विश्वास कमी होण्यासारखे आहे. माणुसकी आणि नैतिकतेच्या चौकटीत बसवून आपण खुर्चीला न्याय देतो का? याचा विचार लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी केला पाहिजे. त्यादृष्टीने यापुढे पाऊल पडावे, अशी अपेक्षा आमदार नीतेश राणे यांनी आमसभेत व्यक्त केली.

ठळक मुद्देमाणुसकी, नैतिकतेच्या चौकटीतून खुर्चीला न्याय द्या : नीतेश राणेप्रशासकीय ढाच्यातील उत्तरांमुळे लोकशाहीवरील विश्वास कमी होईल

वैभववाडी : जनतेच्या प्रश्नांना तांत्रिक उत्तरे देणे म्हणजे लोकप्रतिनिधी आणि प्रशासन पर्यायाने लोकशाहीवरील विश्वास कमी होण्यासारखे आहे. माणुसकी आणि नैतिकतेच्या चौकटीत बसवून आपण खुर्चीला न्याय देतो का? याचा विचार लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी केला पाहिजे. त्यादृष्टीने यापुढे पाऊल पडावे, अशी अपेक्षा आमदार नीतेश राणे यांनी आमसभेत व्यक्त केली.आमदार नीतेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समितीची आमसभा कोकिसरे येथील माधवराव पवार विद्यालयाच्या सभागृहात झाली. सभेला तहसीलदार संतोष जाधव, सभापती लक्ष्मण रावराणे, समाजकल्याण सभापती शारदा कांबळे, उपसभापती हर्षदा हरयाण, गटविकास अधिकारी जयप्रकाश परब, जिल्हा परिषद सदस्य सुधीर नकाशे, पंचायत समिती सदस्य अरविंद रावराणे, दुर्वा खानविलकर, अक्षता जैतापकर, नगराध्यक्षा दीपा गजोबार, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय बाकारे, जिल्हा परिषद सदस्य, बांधकामचे कार्यकारी अभियंता प्रकाश खांडेकर आदी उपस्थित होते.आमसभेत अधिकाऱ्यांनी दिलेल्या पठडीतील उत्तरांमुळे जनतेचे प्रश्न सुटण्याची किंबहुना ते सोडविण्याची मानसिकता दिसली नाही. त्यामुळे सभेचा समारोप करताना आमदार राणे यांनी अधिकाऱ्यांचे कान उपटले. प्रश्न सुटावेत एवढीच जनतेची सभेला येण्यामागची अपेक्षा असते.

प्रत्येक ठिकाणी तांत्रिक मुद्दे पुढे करून चालणार नाही. आम्ही लोकप्रतिनिधी तुमच्यासारखे करू शकत नाही. त्यामुळे मोठे प्रकल्प येतील तेव्हा येऊ दे. पण छोटे-छोटे प्रश्न सुटणे आवश्यक आहे. माणुसकी आणि नैतिकतेच्या चौकटीत बसवून आपण खुर्चीला न्याय देतो का? याचा विचार लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी करावा, असे आवाहन राणे यांनी केले.पंचायत समितीची इमारत आहे त्या स्थितीत ताब्यात घेतली तर दोन महिने टिकणार नाही त्यामुळे वॉटरप्रुफींग झाल्याशिवाय इमारतीचे हस्तांतरण न करण्याची सूचना आमदार राणे यांनी कार्यकारी अभियंता प्रकाश खांडेकर यांना केली. यावेळी नासीर काझी, भालचंद्र साठे, ए. एम. बोबडे, पुरुषोत्तम पाटील, रावजी यादव, महेश गोखले, उदय जैतापकर, सीमा नानिवडेकर, स्नेहलता चोरगे आदींनी प्रश्न मांडले.

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे sindhudurgसिंधुदुर्ग