शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : एसटी प्रशासनाने उतरविलेले होर्डिंग्ज तेथेच पडून, हितवर्धक संघाचा दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 12:15 IST

सावंतवाडी येथील एसटी बसस्थानक परिसरात धोकादायक असलेले होर्डिंग्ज सावंतवाडी शहर हितवर्धक संघाच्या दणक्यानंतर एसटी प्रशासनाने उतरविले खरे, मात्र काढलेले होर्डिंग्ज त्याच ठिकाणी टाकल्याने परिसरात अस्वच्छता पसरली आहे. स्वच्छतेबाबत उदासिन असलेल्या या प्रशासनावर प्रवासीवर्गातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

ठळक मुद्देएसटी प्रशासनाने उतरविलेले होर्डिंग्ज तेथेच पडून, हितवर्धक संघाचा दणका स्वच्छतेबाबत उदासिन असलेल्या प्रशासनाबाबत प्रवाशांतून नाराजी

सावंतवाडी : येथील एसटी बसस्थानक परिसरात धोकादायक असलेले होर्डिंग्ज सावंतवाडी शहर हितवर्धक संघाच्या दणक्यानंतर एसटी प्रशासनाने उतरविले खरे, मात्र काढलेले होर्डिंग्ज त्याच ठिकाणी टाकल्याने परिसरात अस्वच्छता पसरली आहे. स्वच्छतेबाबत उदासिन असलेल्या या प्रशासनावर प्रवासीवर्गातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.पुणे येथे रस्त्यालगत असलेला होर्डिंग कोसळून रिक्षा चालकांना आपला जीव गमवावा लागला होता. मात्र या घटनेतून बोध घेत सावंतवाडी शहर हितवर्धक संघाच्यावतीने माजी नगरसेवक सुरेश भोगटे व अफरोज राजगुरु यांच्यासह नागरिकांनी सावंतवाडी बसस्थानकावरील धोकादायक होर्डिंग्ज संदर्भात आगार व्यवस्थापक एस. बी. सय्यद यांची भेट घेत होर्डिंग्ज तत्काळ हटविण्यास सांगितले होते. त्यावेळी नागरिकांची मागणी लक्षात घेता एसटी प्रशासनाने ते उतरविले होते. मात्र हे होर्डिंग्ज काढल्यानंतर त्यांची विल्हेवाट लावण्याऐवजी त्या ठिकाणीच ते टाकल्याने परिसरात अस्वच्छता निर्माण झाली आहे.हितवर्धक संघाने होर्डिंग्जबरोबर परिसरातील अस्वच्छतेबाबतही तीव्र नाराजी व्यक्त करत सय्यद यांना धारेवर धरले होते. याशिवाय ज्या ठेकेदाराने स्वच्छतेबाबत ठेका घेतला, त्याच्याकडून परिसर स्वच्छ करून घेण्याची मागणी केली होती. मात्र परिसर स्वच्छ करणे सोडाच, पण होर्डिंग्ज खाली काढून ते त्या ठिकाणीच टाकून स्वच्छतेच्या बाबतीत आपण किती गंभीर आहोत, हे उदाहरण त्यांनी दाखवून दिले.दुसऱ्या बाजूने विचार करता काढलेल्या होर्डिंग्जची लोखंडी कमान त्या ठिकाणीच उभी असल्याने भविष्यात त्याचाही धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे ही कमान हलविल्यास भविष्यातील धोका टळू शकतो....तर पुन्हा घेराव घालणारआगार व्यवस्थापक सय्यद यांनी आम्हा नागरिकांना दिलेली आश्वासने पाळावीत. होर्डिंग्जची त्वरित विल्हेवाट लावावी. याशिवाय लोखंडी कमानीबाबत निर्णय घ्यावा. स्वच्छतेच्या बाबतीत हलगर्जीपणा आढळून आल्यास पुन्हा घेराव घालू. ज्याप्रमाणे होर्डिंग्ज काढण्याची तत्परता दाखविली त्याप्रमाणे ती उचलण्यात दाखवावी, अशा इशारा हितवर्धक संघाचे अध्यक्ष सुरेश भोगटे यांनी दिला. 

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळsindhudurgसिंधुदुर्ग