शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : महामार्ग ठेकेदाराचे १५ डंपर अडविले, खड्डे भरून देण्याचे आश्वासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 16:23 IST

खारेपाटण-गगनबावडा राज्य महामार्गावर रस्त्याची दुर्दशा झाल्याने तिथवलीच्या ग्रामस्थांनी सोमवारी सकाळी ८ च्या सुमारास महामागार्चे ठेकेदार केसीसी बिल्डकॉन कंपनीचे १५ डंपर अडविले होते.

ठळक मुद्देमहामार्ग ठेकेदाराचे १५ डंपर अडविले, खड्डे भरून देण्याचे आश्वासन  चौपदरीकरणाच्या अवजड वाहनांमुळे खारेपाटण-तिथवली रस्त्याची दुर्दशा

वैभववाडी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी तिथवलीतून खडी वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांमुळे खारेपाटण-गगनबावडा राज्य महामार्गावर मोठमोठे खड्डे पडून रस्त्याची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे तिथवलीच्या ग्रामस्थांनी सोमवारी सकाळी ८ च्या सुमारास महामागार्चे ठेकेदार केसीसी बिल्डकॉन कंपनीचे १५ डंपर अडविले होते.

कंपनीच्या अधिकाऱ्यांना समज दिल्यावर खड्डे भरून देण्याचे तसेच प्रमुख अधिकाऱ्याशी बैठक करण्याचे आश्वासन दिल्यावर अडविलेले डंपर सोडण्यात आले.केसीसी बिल्डकॉन कंपनीची तिथवलीत स्टोन क्रशर असून तेथून महामार्गाच्या कामासाठी मोठ्या डंपरने खडी वाहतूक होते. पावसाळ्यामुळे तालुक्यातील अन्य क्रशर बंद आहेत. मात्र केसीसी बिल्डकॉनची क्रशर सुरू आहे.

अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे खारेपाटण-गगनबावडा राज्य महामागार्ची तिथवलीपर्यंत खड्ड्यांमुळे दुर्दशा झाल्याने छोटे वाहनधारक व नागरिकांना त्रास होत आहे.

त्यामुळे सोमवारी सकाळी तिथवलीच्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीसमोर १५ डंपर अडविले होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नासीर काझी, माजी सभापती बाळा हरयाण, सरपंच सुरेश हरयाण, सोसायटीचे अध्यक्ष ब्रह्मानंद हरयाण, महादेव हरयाण, रमेश हरयाण व अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.

सकाळी ८ पासून डंपर अडवून ठेवल्यामुळे १०.३० च्या सुमारास केसीसी बिल्डकॉन कंपनीच्या काही अधिकाऱ्यांनी तिथवलीतील ग्रामस्थांशी संपर्क साधला. त्यांनी आठ दिवसांत रस्त्याची दुरुस्ती करून देतो. तसेच कंपनीचे प्रमुख अधिकारी सध्या कोलकत्त्याला असून ते आल्यावर त्यांच्याशी बैठक करून देण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. त्यामुळे साडेअकराच्या सुमारास अडविलेले डंपर सोडून देण्यात आले.लोकांचा विचार करासरपंच सुरेश हरयाण यांनी या घटनेची माहिती देताना सांगितले की, विकासकामाला आमचा अजिबात विरोध नाही. परंतु कंपनीच्या अवजड वाहतुकीमुळे जनतेला त्रास होतो. त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. कंपनीने लोकांचा विचार केला पाहिजे. त्यासाठीच आम्हांला हे पाऊल उचलणे भाग पडले. कंपनीकडून आश्वासन पूर्ण होईल या विश्वासाने आम्ही वाहने सोडली. 

टॅग्स :highwayमहामार्गsindhudurgसिंधुदुर्ग