शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : इन्सुली येथे २१ लाखांचा गुटखा जप्त, अन्नभेसळ विभागाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 17:04 IST

राज्यात गुटखा बंदीचा आदेश असतानाही सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली-डोबवाडी येथे छुप्या पध्दतीने बेकायदा गुटख्याचा मोठ्या प्रमाणात साठा करण्यात आल्याच्या गोपनीय माहितीच्या आधारावर सावंतवाडीचे उपविभागीय पोलीस अधिकारी दयानंद गवस व बांदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदिप कळेकर यांच्या पोलीस पथकाने छापा टाकून २१ लाख ३४ हजार ८०० रुपये किमतीचा बेकायदा गुटखा जप्त केला.

ठळक मुद्देइन्सुली येथे २१ लाखांचा गुटखा जप्तअन्नभेसळ विभागाची कारवाई

बांदा : राज्यात गुटखा बंदीचा आदेश असतानाही सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली-डोबवाडी येथे छुप्या पध्दतीने बेकायदा गुटख्याचा मोठ्या प्रमाणात साठा करण्यात आल्याच्या गोपनीय माहितीच्या आधारावर सावंतवाडीचे उपविभागीय पोलीस अधिकारी दयानंद गवस व बांदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदिप कळेकर यांच्या पोलीस पथकाने छापा टाकून २१ लाख ३४ हजार ८०० रुपये किमतीचा बेकायदा गुटखा जप्त केला.या प्रकरणी गोडाऊनच्या जागेचे मालक कानजी उर्फ पप्या साबाजी राणे (३०, रा. इन्सुली-डोबवाडी) व गोडाऊनची जागा भाडेकरारावर दिलेल्या भूषण उर्फ आबा श्रीकृष्ण शिरसाट (५0, रा. बांदा-बाजारपेठ) यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. कारवाई सोमवारी दुुपारी करण्यात आली.

अन्नभेसळ विभागाचे अधिकारी तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती दयानंद गवस यांनी दिली आहे. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुधीर कदम, हवालदार लक्ष्मण पडकील, सागर भोसले, विनायक पास्ते, अमित सावंत, प्रितम कदम, सचिन कोयंडे, रामचंद्र चव्हाण यांच्या पथकाने ही कारवाई केली.बेकायदा गुुटखा साठ्याचे केंद्र पोलिसांनी छापा टाकून पकडल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यासह गोवा राज्यात देखील छुप्या पध्दतीने गुटख्याची विक्री होत असल्याचे आता उघड झाले आहे. बेकायदा गुटखा विक्रीची पाळेमुळे खोदून काढणार असल्याचे दयानंद गवस यांनी सांगितले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गliquor banदारूबंदी