अठरा लाख रुपयांचा गुटखा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 01:14 AM2018-03-12T01:14:26+5:302018-03-12T01:14:26+5:30

सिन्नर : तालुक्यातील ठाणगाव शिवारात रविवारी (दि. ११) पहाटे तीन वाजेच्या सुमारास केलेल्या धडक कारवाईत तब्बल अठरा लाखांचा गुटखा ताब्यात घेण्यात सिन्नर पोलिसांना यश आले. त्यामुळे राज्यभरात गुटखाबंदी असताना अवैध गुटखा विक्री सुरूच असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Seized gutka worth Rs | अठरा लाख रुपयांचा गुटखा जप्त

अठरा लाख रुपयांचा गुटखा जप्त

Next
ठळक मुद्देसिन्नर : १७ लाख ७० हजार रुपये किमतीची ५९ पोती पोलिसांच्या ताब्यात गुटख्याचे नमुने घेऊन तपासणीसाठी पुण्याला पाठविले

सिन्नर : तालुक्यातील ठाणगाव शिवारात रविवारी (दि. ११) पहाटे तीन वाजेच्या सुमारास केलेल्या धडक कारवाईत तब्बल अठरा लाखांचा गुटखा ताब्यात घेण्यात सिन्नर पोलिसांना यश आले. त्यामुळे राज्यभरात गुटखाबंदी असताना अवैध गुटखा विक्री सुरूच असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
ठाणगाव शिवारात एक मालट्रक संशयास्पद उभा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचून ठाणगाव-केळी रस्त्यावरून शिवारात मालट्रक (एचआर ३८, एक्स १२३६) ताब्यात घेऊन संबंधित मालट्रकचालक कल्लू बगेल (२६, रा. कांधी, ता. जि. शिवपुरी, मध्य प्रदेश) याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. मालट्रकची तपासणी केली असता वॉव (डब्लूओडब्लू) नावाच्या गुटख्याची १७ लाख ७० हजार रुपये किमतीची तब्बल ५९ पोती पोलिसांनी ताब्यात घेतली. पोलिसांनी घटनेची माहिती अन्न भेसळ प्रतिबंधक विभागाला दिली. अन्न सुरक्षा अधिकारी पी. एस. पाटील व एच. के. बाविस्कर यांनी गुटख्याचे नमुने घेऊन तपासणीसाठी पुण्याला पाठविले. पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र लोखंडे, पोलीस हवालदार नितीन मंडलिक, पोलीस नाईक बाबा पगारे, भगवान शिंदे, प्रवीण गुंजाळ, शहाजी शिंदे आदींनी कारवाईत सहभाग घेतला.

Web Title: Seized gutka worth Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा