शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : सरकार शेतकऱ्यांना आत्महत्येस उद्युक्त करते : रघुनाथ दादा पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 16:20 IST

शेतकरी नांगरणीपासून मशागतीपर्यंत अनेक कामांसाठी सरकारला टॅक्स भरत असतो पण सरकार शेतकऱ्यांला हमीभावही देत नाही व निर्यातबंदी करून शेतकऱ्यांना अधोगतीला आणले आहे. पयार्याने शेतकऱ्यांला हे सरकार आत्महत्या करण्यास उद्युक्तच करत आहे असा घणाघाती आरोप शेतकरी सुकाणू समितीचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी सिंधुदुर्गात केला.

ठळक मुद्देसरकार शेतकऱ्यांना आत्महत्येस उद्युक्त करते : रघुनाथ दादा पाटील

सिंधुदुर्गनगरी : शेतकरी नांगरणीपासून मशागतीपर्यंत अनेक कामांसाठी सरकारला टॅक्स भरत असतो पण सरकार शेतकऱ्यांला हमीभावही देत नाही व निर्यातबंदी करून शेतकऱ्यांना अधोगतीला आणले आहे. पयार्याने शेतकऱ्यांला हे सरकार आत्महत्या करण्यास उद्युक्तच करत आहे असा घणाघाती आरोप शेतकरी सुकाणू समितीचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी सिंधुदुर्गात केला.शेतकरी सुकाणू समितीच्यावतीने संपूर्ण महाराष्ट्रभर हुतात्मा अभिवादन व शेतकरी जागर यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. क्रातीसिंह मासाहेब पाटील यांच्या गावातून सुरू केलेली ही जागर यात्रा सिंधुदुर्गात दाखल झाली.

येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात त्यांची जागर सभा झाली. यानंतर पत्रकांशी ते बोलत होते. यावेळी सत्यशोधक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष दीपक जगताप, राज्य संघटक किशोर ढमाले, आम आदमी पक्षाचे विवेक राणे, आनंद डिचोलकर , नैना कुºहाडे, दीपक सावंत आदी उपस्थित होते.रघूनाथदादा पाटील यांनी या जागर यात्रेची माहिती देताना सांगितले की १९ मार्चपासून ही यात्रा सुरू झाली आहे. या सरकारकडुन शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ज माफी मिळावी व शेतमालाला हमीभाव मिळावा अशा शेतकरी हिताच्या मागण्या होत्या. मात्र अगोदरच्या सरकारने काय किंवा या सरकारने काय शेतकऱ्यांच्या तोंडाला पानेच पुसली आहेत. याचा परिणाम म्हणजे महाराष्ट्रात होणाऱ्या शेतकरी आत्महत्या हा आहे.भारताचे धोरण आज शेतमाल निर्यात बंदीचे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन घेऊनही आपल्या मालाला दर घेता येत नाही. भारतात आज प्रचंड मोठ्या प्रमाणावर शेतमाल निर्माण होतो मात्र त्याला योग्य हमीभाव मिळत नाही. उलट शेतकरी मात्र डिझेल म्हणा किंवा अन्य कारणाने म्हणा सर्वाधिक थेट कर सरकारला भरत असतो.३० एप्रिल रोजी जेलभरोरघुनाथदादा म्हणाले, कर्जमाफी जाहीर केली गेली मात्र त्यातही एवढा घोळ घातला गेला की शेतकऱ्यांच्या हाती निराशाच आली. त्याचेच पर्यावसान अजूनही शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये होत आहे.

यासाठी सरसकट कर्जमाफी ही आमची आग्रही मागणी आहे. या जगात यात्रेच्या शेवटी ३० एप्रिलला शासनाच्या शेतकरी धोरण विरोधात सविनय कायदेभंग म्हणून जेलभरो आंदोलन केले जाणार आहे.या सत्याग्रहामुळे महाराष्ट्रातील तुरूंग अपुरे पडतील.

 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गFarmerशेतकरी