शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

सिंधुदुर्ग : राज ठाकरे यांच्या हाती सत्ता द्या : परशुराम उपरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 17:35 IST

कणकवली : मनसे पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्ष स्थापन करताना घेतलेली भूमिका अजूनही सोडलेली नाही. फक्त मतांसाठी ते कधीही ...

ठळक मुद्देराज ठाकरे यांच्या हाती सत्ता द्या : परशुराम उपरकर महाराष्ट्राची अस्मिता ते जपतील; उपरकर यांचे प्रतिपादन

कणकवली : मनसे पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्ष स्थापन करताना घेतलेली भूमिका अजूनही सोडलेली नाही. फक्त मतांसाठी ते कधीही काम करीत नाहीत. महाराष्ट्राची अस्मिता जोपासण्याचे काम खऱ्या अर्थाने ते करीत असून उत्तर भारतीयांच्या व्यासपीठावर जावून त्याना त्यांनी ठणकावले आहे. त्यामुळे मराठी जनतेने राज ठाकरे यांच्या हाती एकदा सत्ता द्यावी त्यांचे सर्वार्थाने भले केल्याशिवाय ते रहाणार नाहीत. असे प्रतिपादन मनसे प्रदेश सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी येथे केले.कणकवली येथील मनसे संपर्क कार्यालयात मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी कणकवली शहराध्यक्ष शैलेंद्र नेरकर उपस्थित होते.परशुराम उपरकर पुढे म्हणाले, उत्तर भारतीयांचे निमंत्रण स्विकारुन त्यांच्या व्यासपीठावर गेलेल्या राज ठाकरे यांनी मराठी माणसाची भूमिका स्पष्ट केली. महाराष्ट्रातील तरुणांचा रोजगार हिरावुन घेण्याचा प्रकार तसेच त्यांच्या अधिकारावर परप्रांतियानी गदा आणणे याविषयी कायद्याचा आधार घेऊन वक्तव्य केले. पंतप्रधानांच्या वक्तव्याचा आधारहि त्यांनी यावेळी घेतला. तसेच महाराष्ट्राची बाजू समर्थपणे मांडली.उत्तर भारतीयांसमोर मनसेच्या 'खळखट्याक' बाबत असलेले गैरसमज स्पष्ट केले. इतर नेते उत्तर भारतीयांच्या व्यासपीठावर जावून त्यांची स्तुती करीत असतात.तसेच त्याना संरक्षण देत असतात. मात्र, राज ठाकरे यांनी परिणामांची तमा न बाळगता आपले विचार स्पष्टपणे मांडले. या राज्यात जो कामानिमित्त येईल त्यांनी येथील भाषा शिकलीच पाहिजे.तसेच महाराष्ट्रातील युवक बाहेरच्या राज्यात जातील तर त्यांनी तेथील भाषा शिकुन समरस व्हावे.असेही सांगितले.महाराष्ट्रात बाहेरील राज्यातून येणारा लोंढा आता थांबवा. माझी भूमिका ही कधीही बदलणार नाही. येथील आया -बहिणींची छेड काढाल तर सोडणार नाही असे ठणकावले आहे. उत्तर भारतीयाना समजावे तसेच आपले विचार त्यांच्या पर्यन्त पोहचावे यासाठी त्यांनी मागणी नुसार हिंदीतून भाषण केले. त्याला चांगला प्रतिसाद लाभला.रेल्वे भरती स्थानिक पातळीवर व्हावी यासाठी मनसेने तत्कालीन केंद्रीय रेल्वे मंत्री लालूप्रसाद यादव यांना पत्र लिहिले होते. मात्र त्याला त्यांनी प्रतिसाद दिला नव्हता. मात्र , ममता बॅनर्जी यांना लिहिलेल्या पत्राची दखल घेऊन त्यांनी तसे आदेश काढल्याची आठवण राज ठाकरे यानी यावेळी करून दिली. त्याचप्रमाणे असे अनेक प्रश्न मनसेने मार्गी लावल्याने जनतेला त्याचा सार्थ अभिमान आहे. मनसेने पक्ष स्थापने पासून आपले मुद्दे सोडलेले नाही. त्या मुद्याशी एकनिष्ठ राहिली आहे. त्यामुळे मनसेनेला चांगला प्रतिसाद मिळत असून आगामी निवडणुकीत जनतेने मनसेला संधी द्यावी. असे आवहनही परशुराम उपरकर यांनी यावेळी केले.

टॅग्स :Parshuram Upkarपरशुराम उपरकर sindhudurgसिंधुदुर्गRaj Thackerayराज ठाकरेMNSमनसे