शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : स्वयंपाकी महिलांचे शोषण, आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 12:39 IST

शालेय पोषण आहार शिजवून देणाऱ्या स्वयंपाकी महिलांचे शोषण करण्याची पातळी शिक्षण विभागाने ओलांडली आहे असा आरोप करत या विरोधात आंदोलन करण्याचा निर्णय सामाजिक शालेय पोषण आहार स्वयंपाकी संघाने घेतला आहे. या आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी १६ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता पणदूर येथे स्वयंपाकी कर्मचाऱ्यांची सभा आयोजित करण्यात आली आहे.

ठळक मुद्देआंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी सभापणदूर येथे स्वयंपाकी कर्मचाऱ्यांची सभा

सिंधुदुर्गनगरी : शालेय पोषण आहार शिजवून देणाऱ्या स्वयंपाकी महिलांचे शोषण करण्याची पातळी शिक्षण विभागाने ओलांडली आहे असा आरोप करत या विरोधात आंदोलन करण्याचा निर्णय सामाजिक शालेय पोषण आहार स्वयंपाकी संघाने घेतला आहे. या आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी १६ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता पणदूर येथे स्वयंपाकी कर्मचाऱ्यांची सभा आयोजित करण्यात आली आहे.साडेतीन तास आगीसमोर बसून स्वयंपाकी महिला शालेय पोषण आहार शिजवून देतात. असे असले तरी त्यांना केवळ एक हजार रुपए एवढे तुटपुंजे मानधन दिले जाते. मात्र त्यासाठीही या कर्मचाऱ्यांना मोर्चे काढावे लागतात. पोषण आहार ज्या ठिकाणी शिजविला जातो. त्याच ठिकाणी या कर्मचाऱ्यांनी सफाई करायची आहे. मात्र त्यांच्याकडून पूर्ण शाळेची सफाई करून घेतली जात आहे. त्याकडे मात्र शिक्षण विभाग मूग गिळून गप्प बसतो.स्वयंपाकी कर्मचाऱ्यांना मनमानीपणे कामावरून काढू नये असे असतानाही देवगड मध्ये काही स्वयंपाकी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आले आहे. या प्रकरणाकडे लक्ष द्यायला शिक्षण विभागाला वेळ नाही. एकंदरित पाहता स्वयंपाकी महिला कर्मचाऱ्यांचे शोषण करण्याची पातळी शिक्षण विभागाने ओलांडली आहे.

या विरोधात आंदोलन करण्याचा निर्णय सामाजिक शालेय पोषण आहार स्वयंपाकी संघाने घेतला आहे. या आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी १६ डिसेंबर रोजी पणदूर येथे स्वयंपाकी कर्मचाऱ्यांची सभा आयोजित करण्यात आली असून या सभेला स्वयंपाकी महिला कर्मचाऱ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन कमल परुळेकर यांनी केले आहे.

टॅग्स :Schoolशाळाsindhudurgसिंधुदुर्ग