शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : ग्रामीण डाक कर्मचाऱ्यांचा अधीक्षक कार्यालयावर मोर्चा, बेमुदत संप कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 16:10 IST

सातव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर कराव्यात, कमलेशचंद्र समितीच्या शिफारसी लागू कराव्यात यासह अन्य मागण्यांसाठी अखिल भारतीय ग्रामीण डाकसेवक संघटना शाखा सिंधुदुर्गच्यावतीने सिंधुदुर्गनगरी येथील अधीक्षक डाक कार्यालयावर धडक मोर्चा काढून शासनाचे लक्ष वेधण्यात आले.

ठळक मुद्देग्रामीण डाक कर्मचाऱ्यांचा अधीक्षक कार्यालयावर मोर्चा, बेमुदत संप कायम विविध घोषणांनी सिंधुदुर्गनगरी दणाणली, शेकडो कर्मचाऱ्यांची उपस्थिती

सिंधुदुर्गनगरी : सातव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर कराव्यात, कमलेशचंद्र समितीच्या शिफारसी लागू कराव्यात यासह अन्य मागण्यांसाठी अखिल भारतीय ग्रामीण डाकसेवक संघटना शाखा सिंधुदुर्गच्यावतीने सिंधुदुर्गनगरी येथील अधीक्षक डाक कार्यालयावर धडक मोर्चा काढून शासनाचे लक्ष वेधण्यात आले.

पेन्शन आमच्या हक्काची ...नाही कुणाच्या बापाची.., ग्रामीण डाकसेवक संघटनेचा विजय असो..., आवाज दो.. हम सब एक है यांसह विविध घोषणा देत सिंधुदुर्गनगरीचा परिसर दणाणून सोडला. शासन जोपर्यंत मागण्या मान्य करीत नाही तोपर्यंत बेमुदत संप सुरूच राहणार असल्याचा निर्धार यावेळी उपस्थित शेकडो डाकसेवकांनी येथे केला.

संघटनेच्यावतीने अधीक्षक डाकघर यांना निवेदन देण्यात आले. (छाया -गिरीश परब)ग्रामीण डाकसेवक संघटना आपल्या न्याय मागण्यांसाठी १८ डिसेंबरपासून बेमुदत संपावर गेली आहे. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुमारे सहाशे डाकसेवक कर्मचारी यात सहभागी झाले आहेत. या आंदोलनाचा भाग म्हणून ग्रामीम डाकसेवक संघटनेचे अध्यक्ष संतोष हरयाण व सचिव जे. ए. मोडक यांच्या नेतृत्वाखाली सिडको बिल्डींग ते अधीक्षक डाक कार्यालय असा मोर्चा काढून शासनाचे लक्ष वेधले. यावेळी शेकडो कर्मचारी उपस्थित होते.शासन वेळोवेळी ग्रामीण डाकसेवक कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक नाही. केवळ आश्वासन देऊन कर्मचाऱ्यांचा भ्रमनिरास करीत आहे. त्यामुळे या अन्यायाविरोधात १८ डिसेंबरपासून जिल्ह्यात बेमुदत काम बंद आंदोलन (संप) पुकारले आहे.

या आंदोलनाला आणखीन धार यावी व शासनापर्यंत कर्मचाऱ्यांचा आवाज पोहोचला पाहिजे यासाठी हा मोर्चा काढण्यात आला. जोपर्यंत शासन स्तरावर डाक कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत माघार घेणार नसल्याचे अध्यक्ष संतोष हरयाण व सचिव जे. ए. मोडक यांनी सांगितले.या आहेत प्रमुख मागण्याडॉ. कमलेशचंद्र समितीच्या सर्व शिफारशी १ जानेवारी २०१६ पासून लागू करव्यात, १२, २४ व ३६ वर्षे सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांना तीन पदोन्नती देऊन अतिरिक्त वेतन वृद्धीचा लाभ देण्यात यावा, सातव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर करण्यात याव्यात, पेन्शन योजना लागू करावी, कंत्राटी ग्रामीण डाक सेवकांना ८ तासांचे काम देऊन त्यांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे, मर्यादित बदली सुविधांचा लाभ त्वरित लागू करण्यात यावा यासह दहा मागण्यांचा समावेश आहे. 

 

टॅग्स :Post Officeपोस्ट ऑफिसsindhudurgसिंधुदुर्ग