शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : समुद्रकिनारी मच्छिमारी ट्रॉलर्स विसावले, ३१ जुलैपर्यंत मासेमारी बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 15:43 IST

पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यासाठी शासनाने मासेमारी बंदी लागू केली आहे. या मासेमारी बंदीमुळे वेंगुर्ले येथील समुद्रकिनारी मच्छिमारी ट्रॉलर्स विसावले आहेत. सुमारे दोन महिने मासेमारी व्यवसाय आता बंद राहणार आहे.

ठळक मुद्दे समुद्रकिनारी मच्छिमारी ट्रॉलर्स विसावले, ३१ जुलैपर्यंत मासेमारी बंदी  खाडीतील मासेमारीला जोर चढणार; मच्छिमारांच्या समस्या जैसे थे

प्रथमेश गुरव सिंधुदुर्ग : पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यासाठी शासनाने मासेमारी बंदी लागू केली आहे. या मासेमारी बंदीमुळे वेंगुर्ले येथील समुद्रकिनारी मच्छिमारी ट्रॉलर्स विसावले आहेत.

सुमारे दोन महिने मासेमारी व्यवसाय आता बंद राहणार आहे. पावसाळ्याच्या कालावधीत दैनंदिन रोजगारासाठी खाडीतील मासेमारी सुरू राहणार असून मत्स्य खवय्यांसाठी या मासेमारीला आता जोर चढणार आहे.जून, जुलै या महिन्यात मत्स्यबीज निर्मिती होते. तसेच पाऊस व वादळी हवामानामुळे जीवितहानी होण्याचा धोका असल्याने शासन या कालावधीत मासेमारी बंदी लागू करण्याचा निर्णय घेते. त्यानुसार यावर्षी १ जून ते ३१ जुलै या कालावधीत शासनाने मासेमारी बंदी लागू केली आहे.

मासेमारी बंदीला आता सुरुवात झाली आहे. पावसाच्या पाण्याने भिजून ट्रॉलर्सचे नुकसान होऊ नये या उद्देशाने माडाची झापे व प्लास्टिकच्या सहाय्याने ट्रॉलर्स किनाऱ्यावर सुरक्षित ठिकाणी ठेवले जात आहेत.शासनाने सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून जाहीर केला. पर्यटनातून रोजगार निर्मितीसाठी अनेक प्रकल्प राबविले गेले. वेंगुर्ल्यात स्वच्छ किनारपट्टी, चांगली हवा असल्याने याठिकाणीही पर्यटक येतात. जर शासनाने मच्छिमारांच्या बोटींग लायसन्स, निवास न्याहारीबाबत लागणाऱ्या प्रक्रियेत काही प्रमाणात सवलत दिल्यास येथील मच्छिमारही निवास न्याहारीमार्फत आपला पर्यायी व्यवसाय निवडू शकतो.वेंगुर्ले किनारपट्टीवर २०१७-१८ या वर्षात मासेमारी करताना मच्छिमारांना बऱ्याच समस्या आल्या. त्या समस्यांबाबत शासनाने विचार करणे आवश्यक आहे. किनाऱ्यांवर मच्छिमारी करताना अनेक समस्यांमुळे मच्छिमारीवरही परिणाम जाणवला. मासेमारीसाठी लागणारे जाळे, डिझेल, रॉकेल, बोटीची डागडुजी, खलाशांची मजुरी आदी खर्च वगळता यावर्षी झालेल्या एकूण मासेमारी व्यवसायातून वर्षभराची गुजराण करणे यावर्षीही अवघड होणार आहे.

 

पर्यटकांसाठी निवास न्याहारी योजनाआम्ही आमच्या स्वामिनी बचतगटाच्या माध्यमातून मांडवी किनारी येणाऱ्या पर्यटकांसाठी न्याहारी योजना राबवित आहोत. यामध्ये पर्यटकांना भारतीय संस्कृतीनुसार अगदी सर्वसामान्यांना परवडेल अशा दरामध्ये पारंपरिक खाद्यपदार्थ उपलब्ध करून देतो. यामध्ये शिरवाळे, मोदक, आंबोळी, घावणे तसेच ताजी मच्छी यांचा समावेश आहे. या सर्व खाद्यपदार्थांना पर्यटकांची चांगली पसंती आहे. फक्त यासाठी पर्यटकांनी पूर्व कल्पना देणे गरजेचे असते. या आमच्या न्याहारी उपक्रमामुळे येथील ८ महिलांना रोजगार उपलब्ध झाला असून पर्यटकांनाही स्थानिक खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येत आहे- श्वेता हुले, अध्यक्षा, स्वामिनी महिला बचतगट, वेंगुर्ले

 

 

मासेमारी हंगाम आता दोन महिन्यांच्या सुटीनंतर सुरू होणार असल्याने वेंगुर्ले समुद्र किनारपट्टीलगत मच्छिमारी ट्रॉलर्स विसावले आहेत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गfishermanमच्छीमार