शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : वीज तारांच्या घर्षणामुळे आग लागून नुकसान; बागायतींची हानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2018 16:30 IST

विजेच्या तारांच्या घर्षणामुळे आग लागून बागायतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याच्या घटना जिल्ह्यात वारंवार घडत आहेत. मात्र याची गंभीर दखल विद्युत महावितरणकडून घेतली जात नसल्याची बाब बुधवारी कृषी समिती सभेत उघड झाली.

ठळक मुद्देवीज तारांच्या घर्षणामुळे आग लागून नुकसान; बागायतींची हानीमहावितरणकडून दखल नाही कृषी समिती सभेत सदस्यांची नाराजी

सिंधुदुर्गनगरी : विजेच्या तारांच्या घर्षणामुळे आग लागून बागायतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याच्या घटना जिल्ह्यात वारंवार घडत आहेत. मात्र याची गंभीर दखल विद्युत महावितरणकडून घेतली जात नसल्याची बाब बुधवारी कृषी समिती सभेत उघड झाली. तसेच या सभेलाही महावितरणचे अधिकारी अनुपस्थित राहिल्याने सदस्यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.जिल्हा परिषद कृषी समितीची सभा येथील बॅ. नाथ पै समिती सभागृहात सभापती तथा उपाध्यक्ष रणजित देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी समिती सचिव तथा जिल्हा कृषी विकास अधिकारी सुधीर चव्हाण, सदस्य संजना सावंत, अमरसेन सावंत, वर्षा पवार, गणेश राणे, महेंद्र चव्हाण, संजय देसाई, समिधा नाईक, तालुका कृषी अधिकारी आदी अधिकारी व खातेप्रमुख उपस्थित होते.जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्याच्या बागायतींमधून वीजवाहिन्या जात आहेत. या वीजवाहिन्यांना गार्डींग किंवा कोटींग केले नसल्याने या वीज वाहिन्यांमध्ये घर्षण होऊन पडणाऱ्य ठिणग्यांमुळे बागायतींना आग लागत आहे. या आगीत शेतकऱ्यांच्या बागायतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

बागायतींना आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. मात्र नुकसानग्रस्त शेतकरी किंवा बागायतदाराला नुकसान भरपाई देण्याबात महावितरण कंपनीने कोणतीही दखल घेतलेली नसल्याची बाब कृषी समितीत उघड झाली. तसेच या मुद्याबाबत पत्रव्यवहार करूनही या कंपनीने अद्याप कार्यवाही केलेली नाही.आंबा व काजू पीक विम्याबाबत चर्चा झाली असता जिल्हा बँकेमार्फत विमा उतरविलेल्या शेतकऱ्यांना विम्याची रक्कम दिली जात नाही. मात्र राष्ट्रीयकृत बँकांमार्फत विमा उतरविलेल्या शेतकऱ्यांना विम्याची रक्कम दिली जाते. याबाबत रणजित देसाई यांनी माहिती मागितली असता केवळ चार तालुक्यांना नुकसान भरपाई मिळाली आहे.

मात्र उर्वरित तालुक्यांच्या प्रस्तावात त्रुटी असल्याने त्यांना मिळाली नाही, असे कृषी अधिकारी शिवाजी शेळके यांनी सांगितले. मात्र, सर्व तालुक्यांमध्ये राष्ट्रीयकृत बँकांमार्फत रक्कम दिली जात नसल्याचे स्पष्ट करीत या योजनेची सविस्तर माहिती पुढील सभेत सादर करण्याचे आदेश दिले.निधीच उपलब्ध नाहीशासनाच्या चांदा ते बांदा योजनेंतर्गत जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाला विविध योजनांसाठी लाखो रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. याबाबत सभेत विचारणा झाली असता या योजनेचा एकही रुपया या विभागाला प्राप्त झाला नसल्याचे अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गfireआगmahavitaranमहावितरण