शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : कणकवलीत शेतकऱ्यांचे उपोषण, लेखी आश्वासनानंतर मागे : कृषी विभागाने अनुदान कमी दिल्याचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 12:09 IST

कणकवली तालुक्यातील शेतकऱ्यांना पॉवर टिलरचे अनुदान १९ हजार प्रमाणे दिले. हे अनुदान खरेदीच्या ५० टक्केप्रमाणे ५५ ते ६० हजार रुपये मिळण्याची गरज होती. त्याविरोधात कृषी कार्यालयासमोर तालुक्यातील शेतकऱ्यांनी साखळी उपोषण छेडले.

ठळक मुद्देपॉवर टिलरचे १९ हजार प्रमाणे शेतकऱ्यांना अनुदान ६० हजार रुपये मिळण्याची गरज कृषी कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे साखळी उपोषण अनुदान मिळण्याच्यादृष्टीने गटविकास अधिकारी मनोज भोसले यांचे आश्वासन

सिंधुदुर्ग : कणकवली तालुक्यातील शेतकऱ्यांना पॉवर टिलरचे अनुदान १९ हजार प्रमाणे दिले. हे अनुदान खरेदीच्या ५० टक्केप्रमाणे ५५ ते ६० हजार रुपये मिळण्याची गरज होती. त्याविरोधात कृषी कार्यालयासमोर तालुक्यातील शेतकऱ्यांनी साखळी उपोषण छेडले.

सभापती भाग्यलक्ष्मी साटम, गटविकास अधिकारी मनोज भोसले यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन अनुदान मिळण्याच्यादृष्टीने लेखी आश्वासन देण्याच्या सूचना केल्या.कणकवली तालुका कृषी कार्यालयांतर्गत उन्नत शेती समृद्ध शेतकरी मोहिमेंतर्गत यंत्र खरेदीसाठी ५० टक्के अनुदानावर प्रस्तावांना मंजुरी दिली होती. त्यानुसार पूजा परब, कमलेश पाटील यांच्यासह अनेक शेतकऱ्यांना कमी अनुदान मिळाले होते. त्यामुळे शेतकरी उपोषणाला बसले होते. त्यात पंचायत समिती सदस्य गणेश तांबे, मिलिंद मेस्त्री, हर्षदा वाळके, नांदगाव सरपंच अप्रोजा नावलेकर, माजी सरपंच संजय पाटील, असलदे सरपंच पंढरी वायंगणकर, गणेश खोत, पूजा परब, कमलेश पाटील, विनायक दळवी, प्रकाश पाटील, भाई मोरजकर, प्रकाश बागवे, विजय टक्के आदी सहभागी झाले होते.

सुमारे १० ते १५ उपोषणकर्त्यांनी सकाळी १० वाजल्यापासून साखळी उपोषणाला सुरुवात केली. शेतकऱ्यांना कृषी सहाय्यकांनी यंत्र खरेदीसाठी ५० टक्के अनुदान असल्याचे सांगून प्रस्ताव केले. त्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली.

मंजुरी देताना १९ हजार कशासाठी? ही अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची केलेली फसवणूक आहे. अधिकाऱ्यांच्या अज्ञानपणामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे. त्याला जबाबदार कोण? अशा शब्दात शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांना जाब विचारला.अधिकाऱ्यांनी घातला घोळ, सर्व अनुदानाचा लावला बट्याबोळ, बंद करा...बंद करा... शेतकऱ्यांची फसवणूक बंद करा, उन्नत शेती समृद्ध शेतकरी...अज्ञान अधिकारी कंगाल शेतकरी, कृषी विभागाचा जाहीर निषेध, असे फलक लावून उपोषणकर्ते उपोषणस्थळी बसले होते.

कृषी अधिकारी राठोड, सहाय्यक कृषी अधिकारी पाचपुते, विभागीय कृषी अधिकारी कांबळे यांनी उपोषणकर्त्यांना आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर येत्या ४५ दिवसांत उर्वरीत अनुदान देण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषणकर्त्यांनी दुपारी उपोषण मागे घेतले.अनुदानासाठी शासनाकडे प्रस्ताव सादरशेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी आमचे प्रयत्न आहेत. शासनाच्या परिपत्रकानुसार प्रत्येक शेतकऱ्याला १९ हजारांचे अनुदान देण्यात आलेले आहे. समृद्ध शेतकरी मोहिमेतील सर्व शेतकऱ्यांना अनुदान त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलेले आहे.

निकषानुसार ज्या शेतकऱ्यांना लाभ द्यायचा होता तो दिलेला आहे. अधिकचे अनुदान पुढील ४५ दिवसांत देण्यात येणार आहे. त्याबाबत कृषी विभागामार्फत शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी विठ्ठल राठोड यांनी दिली. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गFarmerशेतकरी