शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : यशवंत पंचायत राज अभियान विभागस्तरावरील समितीकडून जिल्हा परिषदेची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 19:14 IST

यशवंत पंचायत राज अभियान २०१७-१८ अंतर्गत राज्यातील अतिउत्कृष्ट जिल्हा परिषदांना पुरस्कार देण्यातंर्गत योजनेमध्ये कोकण विभागात सिंधुदुर्ग आणि ठाणे या जिल्हा परिषदांचे नामांकन झाले आहे. या अभियानांतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेची तपासणी करण्यासाठी विभागस्तरीय समिती जिल्ह्यात दाखल झाली असून ही समिती जिल्ह्यात दोन दिवस राहणार आहे.

ठळक मुद्देयशवंत पंचायत राज अभियान विभागस्तरावरील समिती जिल्ह्यात दाखल सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेची तपासणी

सिंधुदुर्गनगरी : यशवंत पंचायत राज अभियान २०१७-१८ अंतर्गत राज्यातील अतिउत्कृष्ट जिल्हा परिषदांना पुरस्कार देण्यातंर्गत योजनेमध्ये कोकण विभागात सिंधुदुर्ग आणि ठाणे या जिल्हा परिषदांचे नामांकन झाले आहे. या अभियानांतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेची तपासणी करण्यासाठी विभागस्तरीय समिती जिल्ह्यात दाखल झाली असून ही समिती जिल्ह्यात दोन दिवस राहणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेबरोबरच मालवण आणि कुडाळ पंचायत समित्यांचेही नामांकन झाले आहे. यशवंत पंचायत राज अभियानात सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने गेली दोन वर्ष राज्यात तृतीय क्रमांक राखला आहे.संपूर्ण स्वच्छता अभियानात देशात अव्वल स्थान प्राप्त केल्यानंतर दीनदयाळ पंचायत राज सक्षमीकरण अभियानातही सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने आपले आवाहन कायम ठेवले आहे. गेली दोन वर्ष सतत यशवंत पंचायत राज अभियानात राज्यात तीन नंबर राखला आहे. तर याहीवर्षी या अभियानात जिल्हा परिषदेचे नामांकन झाले असून यावेळी राज्यात प्रथम येण्यासाठीची तयारी या जिल्हा परिषदेने केली आहे.यशवंत अभियान अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या पुरस्कासाठी नामांकन प्रस्ताव पुष्ठ्यर्थ पुरावे तपासणीसाठी सिंधुदुर्गात पाच सदस्यीय कमिटी दाखल झाली असून यात कोकण विभागीय उपायुक्त (आस्थापना), सहाय्यक आयुक्त (चौकशी) माणिकराव दिवे, लेखा संचालक रवींद्र खेडकर, प्रशिक्षण केंद्र्र, गारगोटीचे प्राध्यापक डॉ. सूर्यवंशी, सहाय्यक संचालक आदिवासी विभाग चौगुले यांचा समावेश आहे.या समितीने शुुक्रवारी सकाळी मालवण पंचायत समितीची तपासणी केली. त्यानंतर दुपारपासून सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेची तपासणी सुरु केली असून शनिवारी ही समिती कुडाळ पंचायत समितीची तपासणी करणार आहे.तपासणीत जिल्हा परिषदेत तसेच दोनही पंचायत समित्यांच्या सभा कामकाज, अनुसूचित जाती जमाती संदर्भातील कामकाज, महिला सदस्यांचा सभांमधील सहभाग, गणपुर्ततेविना तहकूब होणाऱ्या सभा, अंदाजपत्रक, अभिलेख योग्यप्रकारे जतन केले जातात का, गट क, व गट ड, ची भरतीप्रक्रिया, सेवाजेष्ठता याद्या, अनधिकृत रित्या गैरहजर कर्मचारी, कर्मचाऱ्यांच्या तक्रार निवारणासाठी जिल्हा परिषदेने केलेले नियोजन आदी बाबींची तपासणी हे पथक करणार आहे. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गzpजिल्हा परिषद