शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : रात्रीच्यावेळी रस्त्याचे चोरीछुपे काम, वझरे गावातील प्रकार, शेतकरी आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 18:57 IST

वझरे येथे होत असलेल्या खडी क्रशर प्लान्टसाठीची यंत्रसामुग्री नेण्याकरिता शेतकऱ्यांच्या जमिनीतून रात्रीच्यावेळी चोरीछुपे खोदण्यात येणाऱ्या रस्त्याचे काम शुक्रवारी शेतकऱ्यांनी रोखले. भाजपाचे तालुकाध्यक्ष सुधीर दळवी व पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला.

ठळक मुद्दे रात्रीच्यावेळी रस्त्याचे चोरीछुपे काम, वझरे गावातील प्रकार शेतकरी आक्रमकक्रशरसाठी यंत्रसामुग्री नेण्याचे काम

दोडामार्ग : वझरे येथे होत असलेल्या खडी क्रशर प्लान्टसाठीची यंत्रसामुग्री नेण्याकरिता शेतकऱ्यांच्या जमिनीतून रात्रीच्यावेळी चोरीछुपे खोदण्यात येणाऱ्या रस्त्याचे काम शुक्रवारी शेतकऱ्यांनी रोखले. भाजपाचे तालुकाध्यक्ष सुधीर दळवी व पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. त्याचप्रमाणे दोडामार्ग तहसीलदार रोहिणी रजपूत यांच्याकडे लेखी तक्रारही दाखल केली आहे.वझरे येथे एक खासगी कंपनी खडी क्रशर प्लान्ट उभारण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी जमीनही खरेदी करण्यात आली आहे. मात्र, हा प्लान्ट उभारण्यासाठी यंत्रसामग्री ट्रेलरद्वारे नेण्याकरिता रस्ता नाही. गावातील रस्ता हा अरूंद आहे. शिवाय अवजड मालाची वाहतूक करण्यास गावकऱ्यांची हरकत असल्याने वझरे गावच्या वेशीवरून स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनीतून रस्ता काढण्याचे काम सुरू आहे.काही जमीनमालकांना रस्त्याचा मोबदला देण्यात आला आहे. तर काहींचा स्वत:च्या जमिनीतून रस्ता देण्यास पूर्ण विरोध आहे. त्यामुळे रात्रीच्यावेळी चोरीछुपे रस्त्याचे खोदकाम सुरू करण्यात आले. याबाबतची माहिती शेतकऱ्यांना समजताच रस्ता काढण्यासाठी आणण्यात आलेला जेसीबी व अवजड माल वाहून नेणारा ट्रेलर रोखला व रस्त्याचे काम बंद पाडले.

याबाबतची माहिती दोडामार्ग तालुक्यातील भाजपा पदाधिकाऱ्यांना समजताच तालुकाध्यक्ष सुधीर दळवी, पंचायत समिती सदस्य बाळा नाईक, नगरसेवक चेतन चव्हाण, प्रमोद कोळेकर, समीर रेडकर, प्रवीण गवस, बाळा कोरगावकर, चंदू मुळीक, देव शेटकर आदींनी घटनास्थळी जात शेतकऱ्यांना पाठिंबा दिला. तसेच याबाबतची लेखी तक्रार तहसीलदार रोहिणी रजपूत यांच्याकडे दिली.त्यानुसार घटनेचा पंचनामा मंडळ अधिकारी नाना देसाई यांनी केला असून अनधिकृतरित्या रस्ता तयार झाल्याचे मान्य करीत तसा अहवाल तहसीलदारांकडे देणार असल्याचे सांगितले. यावेळी जमीनमालक कृष्णा रामा काळकेकर, नारायण आत्माराम सिदये, रूपेश रावजी खोत, सत्यवान बाबणी काळकेकर, सुरेश रामा गवस, चंद्रावती चंद्रकांत काळकेकर, नकुळ वासुदेव काळकेकर आदी शेतकरी उपस्थित होते.तो पुढारी कोण?वझरे येथे खडी क्रशर प्लान्टसाठी रस्ता खोदाईचे काम करताना एका राजकीय पक्षाचा पुढारी गावात येऊन जमीनमालकांना समजाविण्याचा प्रयत्न करीत आहे. हा प्लान्ट शासनाचा आहे. त्यामुळे त्याला विरोध करू नका, असे सांगून ग्रामस्थांची दिशाभूल करीत आहे, असे यावेळी गावकऱ्यांनी सांगितले. त्यामुळे हा पुढारी कोण याची चर्चा वझरे गावात सुरू आहे. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गFarmerशेतकरी