शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : कणकवलीत गटार तुंबल्याने सांडपाणी रस्त्यावर, उपाययोजना करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2018 16:04 IST

कणकवली प्रांत कार्यालय ते हुन्नरे घरापर्यंत जाणारे गटार कचरा, माती साठून तुंबल्याने या गटारातील पाणी मुंबई-गोवा महामार्गावर तसेच प्रांत कार्यालयासमोरील रस्त्यावर वाहून येत आहे. त्यामुळे येथे असलेल्या खड्ड्यात हे पाणी साठून रहात आहे. याचा त्रास नागरिकांना होत आहे. यामुळे हे गटार तत्काळ साफ करण्याची मागणी करण्यात येत आहे.

ठळक मुद्देकणकवलीत गटार तुंबल्याने सांडपाणी रस्त्यावर नगरपंचायतीने उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी

कणकवली : कणकवली प्रांत कार्यालय ते हुन्नरे घरापर्यंत जाणारे गटार कचरा, माती साठून तुंबल्याने या गटारातील पाणी मुंबई-गोवा महामार्गावर तसेच प्रांत कार्यालयासमोरील रस्त्यावर वाहून येत आहे. त्यामुळे येथे असलेल्या खड्ड्यात हे पाणी साठून रहात आहे. याचा त्रास नागरिकांना होत आहे. यामुळे हे गटार तत्काळ साफ करण्याची मागणी करण्यात येत आहे.या परिसरातील नागरिकांच्या तक्रारीवरून या प्रभागातील नगरसेवक रुपेश नार्वेकर यांनी गुरुवारी याठिकाणची पहाणी केली. कणकवली नगरपंचायतीकडून गटार सफाईची कामे हाती घेण्यात आली आहेत. मात्र ही मोहीम पूर्ण न झाल्याने काही ठिकाणी गटारे तुंबलेल्या स्थितीत आहेत.

शहरातील सर्वच ठिकाणचे सफाईचे काम न झाल्याने लोकप्रतिनिधी म्हणून नागरिकांच्या रोषाला आम्हांला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे नगरपंचायतीकडून हे काम न झाल्यास आपल्या स्तरावर हा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे नगरसेवक नार्वेकर यांनी यावेळी सांगितले.त्यामुळे आता नगरपंचायतीने हे तुंबलेले गटार साफ करून सांडपाण्याचा निचरा करणे महत्त्वाचे बनले आहे. अन्यथा या सांडपाण्यामुळे दुर्गंधी पसरून डासांचा प्रादुर्भाव वाढेल. तसेच नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवू शकतो. या सांडपाण्यामुळे प्रांत कार्यालय प्रवेशद्वारावर चिखलाचे साम्राज्य पसरले असून त्यातूनच नागरिकांना मार्ग काढत जावे लागत आहे.दंडात्मक कारवाई करणारदरम्यान, ज्या ठिकाणाहून हे सांडपाणी वाहून येते त्या संबंधित मालकाला नगरपंचायतीकडून या सांडपाण्याचे व्यवस्थापन करण्याची नोटीस बजावली आहे. तसेच त्याच्यावर दंडात्मक कारवाई करणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र या ठिकाणी सांडपाणी जाण्यासाठी असलेले गटार कचरा व मातीने तुंबल्याने सांडपाण्याचा निचरा होत नसल्याचे संबंधित मालक व नगरसेवकांचे म्हणणे आहे. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गhighwayमहामार्ग