शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

सिंधुदुर्ग : ...तर पाणीटंचाईच्या बैठकाही घेऊ नका, मालवण तालुक्यावर निधी वाटपात अन्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 13:19 IST

जिल्ह्यातील अन्य तालुक्यांमध्ये पाणी टंचाईच्या कामांसाठी निधी येत असताना मालवण तालुक्यावरच निधी वाटपात अन्याय होतो, असा आरोप करताना पाणीटंचाई आराखड्यातील कामांना मंजुरी द्यायची नसेल, तर यावर्षी आढावा बैठकही घेऊ नका, अशी आक्रमक भूमिका गटनेने सुनील घाडीगांवकर यांनी मांडली.

ठळक मुद्दे...तर पाणीटंचाईच्या बैठकाही घेऊ नका, मालवण तालुक्यावर निधी वाटपात अन्यायगतवर्षीच्या आराखड्यातील एकही कामांना मंजुरी नाही : सुनील घाडीगांवकर आक्रमक

मालवण : तालुक्यातील डोंगरी भागातील गावांना पाणी टंचाईची समस्या भासते. आमदार वैभव नाईक दरवर्षी पाणी टंचाई आराखडा तयार करतात. मात्र ते पाठपुरावा करण्यात अपयशी ठरत असल्याने एकही काम जिल्हाधिकारी मंजूर करत नाही. जिल्ह्यातील अन्य तालुक्यांमध्ये पाणी टंचाईच्या कामांसाठी निधी येत असताना मालवण तालुक्यावरच निधी वाटपात अन्याय होतो, असा आरोप करताना पाणीटंचाई आराखड्यातील कामांना मंजुरी द्यायची नसेल, तर यावर्षी आढावा बैठकही घेऊ नका, अशी आक्रमक भूमिका गटनेने सुनील घाडीगांवकर यांनी मांडली.दरम्यान, गतवर्षी आढावा बैठकीत पाणीटंचाईच्या आराखड्यात ४७ कामांचा समावेश करण्यात आला होता. मात्र जिल्हाधिकारी यांनी मालवण तालुक्यातील एकाही कामाला मंजुरी दिली नाही. टंचाई आराखड्यातील कामे प्राधान्याने घ्या, अशा सूचना आमदारांनी करूनही प्रत्यक्षात एकही काम मंजूर होत नाही, ही जनतेची शोकांतिका आहे, असे सांगताना तालुक्यात पाणी टंचाई असणाऱ्या भागात निधी मंजूर करण्यात यावा, असा ठराव घाडीगांवकर यांनी मांडला.मालवण पंचायत समितीची मासिक सभा छत्रपती संभाजीराजे सभागृहात सभापती सोनाली कोदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपसभापती अशोक बागवे, गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर, कृषी अधिकारी संजय गोसावी, सदस्य कमलाकर गावडे, विनोद आळवे, अजिंक्य पाताडे, राजू परुळेकर, सुनील घाडीगांवकर, मनीषा वराडकर, निधी मुणगेकर, मधुरा चोपडेकर, सागरिका लाड, गायत्री ठाकूर यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते. सभेत पाणीपुरवठा विभाग, वीज वितरण, शिक्षण विभाग तसेच जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या प्रलंबित आणि अपूर्ण कामांवर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.सदस्यांना स्वनिधी मिळावा!पंचायत समितीच्या सदस्यांना जिल्हा नियोजनमधून स्वनिधी उपलब्ध करून देण्याबाबतचा ठराव अजिंक्य पाताडे यांनी मांडला. आम्हा सदस्यांना स्वनिधी मिळाल्यास आम्ही विकासकामे सुचवू शकू. याबाबत पालकमंत्री केसरकर यांनी जिल्हा नियोजनमध्ये स्वनिधीबाबत तरतूद करावी, असे मत परुळेकर यांनी मांडले. तर ग्रामीण भागातील शाळा डिजिटल झाल्या असून त्यांना इंटरनेट सेवा उपलब्ध करून देण्याबाबत कार्यवाही केली जावी, अशी सूचना परुळेकर यांनी मांडली.

टॅग्स :Malvan police stationमालवण पोलिस स्टेशनWaterपाणीsindhudurgसिंधुदुर्ग