शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा निवडणुकीत एसटी'चा सिंधुदुर्ग विभाग मालामाल; किती लाखाचे उत्पन्न मिळाले.. जाणून घ्या

By सुधीर राणे | Updated: May 13, 2024 17:43 IST

आगारांमधून १२० बस व १७ मालवाहक ट्रकची व्यवस्था करण्यात आली होती

कणकवली : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात ७ मे रोजी मतदान झाले. मतदान पथकांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मतदान केंद्रांपर्यंत ६ मे रोजी नेवून सोडणे व ७ मे रोजी निवडणूक मतदान प्रक्रिया पार पाडल्यानंतर त्यांना परत घेऊन येण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आगारांमधून १२० बस व १७ मालवाहक ट्रकची व्यवस्था करण्यात आली होती. तर मतदान साहित्याच्या वाहतुकीसाठी १० मालवाहक ट्रकचा वापर करण्यात आला होता.या सर्वगाड्यांच्या भाड्यापोटी महामंडळाच्या सिंधुदुर्ग विभागाला शासनाकडून सुमारे ४९ लाखांचे उत्पन्न मिळाले आहे.त्यामुळे एसटीचा हा विभाग एकप्रकारे मालामाल झाला आहे.बॅलेट युनिट, व्हीव्हीपॅट व इतर साहित्य ने-आण करणे, यासह कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रांवर घेऊन जाण्यासाठी एसटी बसची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच साहित्य वाहतुकीसाठी मालवाहू ट्रकचा वापरही करण्यात आला होता. जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघांतील मतदान केंद्रांवर पाठविण्यासाठी १२० बस व १० मालवाहू ट्रक ६ आणि ७ मे रोजी राखीव ठेवण्यात आल्या होत्या.त्यामुळे दोन दिवस जिल्हांतर्गत वाहतूक काहीशी प्रभावित झाली होती. मतदानासाठी दोन दिवस १२० बसची सेवा!रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात ७ मे रोजी मतदान झाले. मतदान कर्तव्यासाठी ६ व ७ मे रोजी महामंडळाच्या १२० बस गाड्यांची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे महामंडळाला चांगले उत्पन्न मिळाले आहे.महामंडळाच्या उर्जितावस्थेसाठी असे विविध उपक्रम फलदायी ठरत आहेत यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी मालवण दौऱ्यावर आले होते.त्यावेळीही महामंडळाच्या बस लोकांना ने-आण करण्यासाठी आरक्षित करण्यात आल्या होत्या.त्यामुळेही चांगले उत्पन्न मिळाले होते.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गratnagiri-sindhudurg-pcरत्नागिरी-सिंधुदुर्गlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४