शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग जिल्हा ब्रेक द चेनच्या तिसऱ्या टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 11:10 IST

Corona virus uday Samant Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सध्या घटत असलेला कोरोनाबाधितांचा आकडा आणि पॉझिटिव्हिटी रेट कमी झाला  असल्याने सिंधुदुर्ग जिल्हा कोरोनाच्या चौथ्या स्तरातून तिसऱ्या स्तरात आला असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.

ठळक मुद्देसिंधुदुर्ग जिल्हा ब्रेक द चेनच्या तिसऱ्या टप्प्यातकोरोनाबाधितांचा आकडा आणि पॉझिटिव्हिटी रेट झाला कमी

ओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सध्या घटत असलेला कोरोनाबाधितांचा आकडा आणि पॉझिटिव्हिटी रेट कमी झाला  असल्याने सिंधुदुर्ग जिल्हा कोरोनाच्या चौथ्या स्तरातून तिसऱ्या स्तरात आला असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.

सोमवारपासून सर्व प्रकारची दुकाने सोमवार ते शुक्रवार या दिवशी सायंकाळी ४ वाजेपर्यंत खुली करण्यास मुभा देण्यात येणार आहे, तसेच जिल्ह्यात काही बाबींमध्ये शिथिलता देण्यात आली असली तरी सामाजिक अंतरसह शासकीय नियमांचे पालन केल्यास ८ ते १० दिवसांत जिल्हा दुसऱ्या टप्प्यात येईल, अशी आशाही व्यक्त केली.सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी ऑनलाइन पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट कमी झाला आहे. हा रेट २७ वरून ९ टक्क्यांच्या आत आला आहे. जिल्ह्यात सध्या एकूण उपलब्ध खाटांच्या ५५.२० टक्के खाटा (बेड) रिक्त आहेत.

जिल्हा ब्रेक द चेनच्या चौथ्या टप्प्यातून तिसऱ्या टप्प्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात अनेक बाबींमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवेतील आस्थापनांसह अन्य आस्थापना सोमवार ते शुक्रवार या कालावधीत सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत.सायंकाळी ४ वाजेनंतर अत्यावश्यक सेवा वगळून सर्व बंदअत्यावश्यक सेवा मात्र सर्व दिवस सुरू राहणार आहेत. रेस्टॉरंट आणि हॉटेलही सोमवार ते शुक्रवार सायंकाळी ४ वाजेपर्यंत ५० टक्के आसन क्षमतेने सुरू, तर सायंकाळी ४ वाजेनंतर केवळ पार्सल सुविधा उपलब्ध असणार आहे. सार्वजनिक वाहतूक सुरू केली जाणार असून, त्यात उभ्याने प्रवास करता येणार नाही.

सलून, ब्युटीपार्लरही सुरू होणार आहेत. सर्व दुकानांना ही शिथिलता दिली असली तरी अत्यावश्यक सेवा वगळून सर्व दुकाने सायंकाळी ४ वाजता पूर्णतः बंद करणे बंधनकारक असून, तसे न झाल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.हा निर्णय शासनाच्या निर्देशानुसारजिल्ह्यात कोरोनामध्ये काहीशा प्रमाणात शिथिलता देत सर्व दुकाने सुरू करण्यास मान्यता देण्यात आली. हा निर्णय शासनाच्या निर्देशानुसार घेण्यात आला आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यासाठी कोणी दबाव आणला त्यामुळे घेतला असे नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्गUday Samantउदय सामंत