सिंधुदूर्ग जिल्ह्यातरी सभापती-उपसभापतीपदाच्या निवडी उत्साहात
By Admin | Updated: September 15, 2014 00:01 IST2014-09-14T22:24:00+5:302014-09-15T00:01:09+5:30
राजकीय घडामोडींना वेग आला होता.

सिंधुदूर्ग जिल्ह्यातरी सभापती-उपसभापतीपदाच्या निवडी उत्साहात
सिंधुदूर्ग जिल्ह्यातरी सभापती-उपसभापतीपदाच्या निवडी उत्साहात पार पडल्या. यावेळी राजकीय घडामोडींना वेग आला होता. काहींची नाराजी तर काही ठिकाणी बाचाबाची व चिठ्टीने या निवडी पूर्ण करण्यात आल्या.
सभापतीपदी मनोज सारंग;
उपसभापती स्मिता राणे
देवगड पंचायत समिती : भाजपच्या घारे, बांबुळकर पराभूत
सभापतीपदी सीमा परुळेकर
मालवण पंचायत समिती : उपसभापतीपदी देवानंद चिंदरकर
कुडाळात प्रतिभा घावनळकर बिनविरोध
पंचायत समिती सभापती निवड : उपसभापतीपदी रामचंद्र सावंत
नाराज राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांची अनुपस्थिती
काँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी झाली, असे म्हणून या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादीचे सभापती उपसभापती बसले. मात्र, या निवडणुकीत राष्ट्रवादीचे पंचायत समिती सदस्य अतुल बंगे व तन्वी पवार यांनी अनुपस्थिती दर्शविली. त्यामुळे हे दोन सदस्य नाराज आहेत काय? अशी चर्चा होती.
सुचिता वजराठकर वेंगुर्लेच्या
सभापतीपदी; चिठ्ठीव्दारे निकाल
पंचायत समिती : उपसभापती स्वप्निल चमणकर
दोन्ही गटात शाब्दीक बाचाबाची
दोन्ही गटांना सभापती, उपसभापती पदाची खात्री असल्याने व मतांची टाय झाल्याने यामध्ये दोन्ही गटांना चिठ्ठ्यातून आलेल्या निवडीत पद मिळालेले हे पद कोणी एका सदस्याच्या चुकीमुळे मिळाले. या रागाचे पर्यावसन वेंगुर्ले पंचायत समितीच्या समोर दोन्ही गटातील शाब्दिक चकमकीत झाले. उपसभापती पदाचे उमेदवार समाधान बांदवलकर व सभापतीपदाची चित्रा कनयाळकर या दोन्ही पराभूत उमेदवारांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून हे प्रकरण मिटविले.
सावंतवाडीत चिठ्ठीवर राष्ट्रीय काँग्रेसची बाजी
उपसभापती महेश सारंग : पंचायत समिती सभापतीपदी प्रमोद सावंत विराजमान
नियतीनेही केसरकरांना नाकारले : सतीश सावंत
काँॅग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश सावंत यांनी काँॅग्रेसच्या विजयानंतर नियतीनेही दीपक केसरकर यांना नाकारले, अशी प्रतिक्रिया दिली. आमदारकीच्या निवडणुकीत केसरकरांना जनता त्यांची जागा दाखवेल, असेही सांगत कार्यकर्त्यांच्या चांगल्या कामाचे फळ मिळाल्याचे सांगितले.
वैभववाडीत महिला राज
सभापतीपदी वैशाली रावराणे : उपसभापती शोभा पांचाळ
नियतीनेही
केसरकरांना नाकारले : सतीश सावंत
काँॅग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश सावंत यांनी काँॅग्रेसच्या विजयानंतर नियतीनेही दीपक केसरकर यांना नाकारले, अशी प्रतिक्रिया दिली. आमदारकीच्या निवडणुकीत केसरकरांना जनता त्यांची जागा दाखवेल, असेही सांगत कार्यकर्त्यांच्या चांगल्या कामाचे फळ मिळाल्याचे सांगितले.