आधार नोंदणी लिंक मोहिमेत राज्यात सिंधुदुर्ग जिल्हा प्रथम
By Admin | Updated: July 31, 2015 01:27 IST2015-07-31T01:27:52+5:302015-07-31T01:27:52+5:30
कोल्हापूर जिल्हा द्वितीय

आधार नोंदणी लिंक मोहिमेत राज्यात सिंधुदुर्ग जिल्हा प्रथम
कुडाळ : मतदार यादीतील आधार नोंदणी लिंक मोहिमेत राज्यात सिंधुदुर्ग जिल्हा प्रथम, तर कोल्हापूर जिल्हा द्वितीय असल्याची माहिती कुडाळ निवडणूक विभागाने दिली. जिल्ह्यात कुडाळ विधानसभा मतदारसंघ याबाबतीत प्रथम क्रमांकावर आहे. राष्ट्रीय निवडणूक विभागाने मतदार यादी सदोष करण्याची मोहीम सुरू केली आहे.
मतदार यादीतील मतदारांच्या आधार कार्डची नोंदणी मतदार यादीत जोडण्याची मोहीम निवडणूक विभागाने १२ मार्च ते ३१ जुलै २0१५ या कालावधीत सुरू केली होती. या मोहिमेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ६ लाख २६ हजार ९८0 मतदारांपैकी ३ लाख २६ हजार ९५९ एवढी म्हणजे ५0.५४ टक्के आधार नोंदणी पूर्ण झालेली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ विधानसभा मतदारसंघातील २ लाख ५ हजार १३७ मतदारांपैकी १ लाख ११ हजार १३७ एवढी आधार नोंदणी पूर्ण झालेली आहे.
कणकवली विधानसभा मतदारसंघातील २ लाख २३ हजार ६७ मतदारांपैकी १ लाख १५ हजार ९६0 एवढी तर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील २ लाख १८ हजार ७७६ मतदारांपैकी ९९ हजार ८८४ एवढ्या मतदारांच्या आधार नोंदणीचे लिंकिंग पूर्ण झाल्याची माहिती कुडाळ निवडणूक विभागाने दिली आहे. (प्रतिनिधी )