शहरं
Join us  
Trending Stories
1
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
2
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
3
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
4
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
5
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
6
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
7
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
8
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
9
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
10
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
11
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
12
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
13
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
14
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
15
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
16
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
17
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
18
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
19
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
20
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय

सिंधुदुर्ग जिल्हा तापाने फणफणतोय, शेकडो रुग्ण सर्दी, ताप, खोकल्याने बेजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 14:28 IST

वातावरणात होणाऱ्या सततच्या बदलाच्या परिणामाने सिंधुदुर्ग जिल्हा तापाने फणफणल्याचे जिल्हा सामान्य रुग्णालय, आरोग्य केंद्र तथा खासगी दवाखान्यांत होत असलेल्या रुग्णांच्या गर्दीवरून दिसत आहे. सद्यस्थितीत शेकडो रुग्ण सर्दी, ताप, खोकल्याने बेजार झाले आहेत.

ठळक मुद्देसिंधुदुर्ग जिल्हा तापाने फणफणतोयशेकडो रुग्ण सर्दी, ताप, खोकल्याने बेजार

सिंधुदुर्गनगरी : वातावरणात होणाऱ्या सततच्या बदलाच्या परिणामाने सिंधुदुर्ग जिल्हा तापाने फणफणल्याचे जिल्हा सामान्य रुग्णालय, आरोग्य केंद्र तथा खासगी दवाखान्यांत होत असलेल्या रुग्णांच्या गर्दीवरून दिसत आहे. सद्यस्थितीत शेकडो रुग्ण सर्दी, ताप, खोकल्याने बेजार झाले आहेत.

जिल्हा रुग्णालयात शनिवारी दुपारी बारा वाजेपर्यंत विविध आजारांचे ४५० रुग्ण उपचारासाठी दाखल झाले होते. दरम्यान, ही सर्व स्थिती पाहता जिल्ह्यातील जनतेने घाबरून न जाता काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी केले आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात हजारो तापाचे रुग्ण आढळले आहेत. डेंग्यू, मलेरिया, स्वाईन फ्ल्यूचे रुग्ण आढळले नसले तरी साध्या तापाने बहुतांशी जण हतबल झाले आहेत. हवामानातील विलक्षण बदलाने जिल्ह्यात तापाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे.जिल्ह्यातील जिल्हा, उपजिल्हा, ग्रामीण रुग्णालयांसह आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांत तापाने फणफणलेले रुग्ण दाखल होत आहेत. बहुतेक रुग्ण खासगी दवाखान्यात दाखल होऊन उपचार करून घेत आहेत. काही रुग्णांना शासकीय रुग्णालयांसह खासगी रुग्णालयात दाखल करून घेतले आहे. या तापसरीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर व अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी जनतेला तब्येतीची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

  • ताप आल्यास तत्काळ नजीकच्या शासकीय रुग्णालयात दाखल होऊन रक्त तपासणी करा. शेतीची कामे करताना सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असेही त्यांनी यावेळी आवाहन केले आहे.केसपेपर, औषधांसाठी रांगाच रांगा 

ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास ४५० रुग्णांनी तपासणीसाठी नोंद केली होती. यात बहुतांशी रूग्ण हे सर्दी, ताप, खोकल्याचे होते. दुपारी एक वाजेपर्यंत बाह्यरुग्ण विभाग सुरू असल्याने केसपेपर काढण्यासाठी रुग्णांची रांग लागली होती. तर तपासणी करून आलेले रुग्ण रांगेत राहून औषधे घेत होते.

टॅग्स :Healthआरोग्यdocterडॉक्टरSatara areaसातारा परिसर