शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
2
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
3
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
4
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
6
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
7
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
8
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
9
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
10
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
11
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
12
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले
13
Navratri 2025: नवरात्रीला घटस्थापना कशी करावी? जाणून घ्या साहित्य, मुहूर्त आणि शास्त्रोक्त विधी!
14
निलेश साबळेनेच मला बाईचं कॅरेक्टर करायला सांगितलं होतं, भाऊ कदमचा खुलासा
15
भूपतीचा शस्त्रसंधीचा प्रस्ताव, जगन म्हणतो शस्त्र ठेवणार नाही ! माओवादी संघटनेतील वाद चव्हाट्यावर
16
अमेरिकेत करिअरचे दार उघडणारा H-1B व्हिसा काय आहे? कोणाला मिळतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती...
17
पुढच्या आठवड्यात येणार IPO चा पाऊस, २२ आयपीओंमध्ये मिळणार गुंतवणूकीची संधी; कोणत्या आहेत कंपन्या?
18
हृदयस्पर्शी! "आई-वडिलांना सोडून मुलगी गेली लंडनला"; ८० वर्षांचे आजोबा ट्रेनमध्ये विकतात पदार्थ
19
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
20
GST Rate Cut: ५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?

सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात पुन्हा अव्वल

By admin | Updated: June 13, 2017 23:32 IST

सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात पुन्हा अव्वल

लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत कोकण विभाग पुन्हा राज्यात अव्वल आला आहे. कोकणचा निकाल ९६.१८ टक्के इतका लागला आहे. कॉपीविरहित निकाल हे वैशिष्ट्य पुन्हा एकदा कोकण विभागाने कायम ठेवले असून, एकाही विद्यार्थ्याचा निकाल राखीव ठेवण्यात आलेला नाही. शनिवार, दि. २४ जून रोजी विद्यार्थ्यांना सकाळी ११ वाजता शाळेमध्ये गुणपत्रके उपलब्ध होणार आहेत. जिल्हास्तरीय निकालात ९७.५५ टक्के निकाल लागलेला सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात पुन्हा पहिल्या क्रमांकावर राहिला आहे. दोन जिल्ह्यात मिळून २७ विद्यार्थ्यांना ‘बेस्ट फाईव्ह’मध्ये ५०० पैकी ५०० गुण मिळाले आहेत.मंडळाचे प्रभारी अध्यक्ष व विभागीय सचिव आर. बी. गिरी यांनी पत्रकार परिषदेमध्ये याबाबतची माहिती दिली. राज्यातील एकूण ९ मंडळामध्ये कोकण मंडळाचा निकाल सर्वाधिक आहे. कोल्हापूर मंडळाचा ९३.५९ टक्के, तर पुणे मंडळाचा ९१.९५ टक्के इतका निकाल लागला आहे. कोल्हापूर व पुणे मंडळांनी अनुक्रमे दुसरा, तिसरा क्रमांक मिळविला असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. सर्वाधिक कमी निकाल नागपूर मंडळाचा असून, तो ८३.६७ टक्के इतका लागला आहे.रत्नागिरी-सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांतून ३९ हजार ६३२ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी ३९ हजार ६१७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात २० हजार ६२७ विद्यार्थ्यांचा समावेश असून, त्यातील १९ हजार ७३८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९५.६९ टक्के इतके आहे. दोन जिल्ह्यांतून १८ हजार ९९० विद्यार्थिनी परीक्षेला बसल्या होत्या. त्यातील १८ हजार ३६६ उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९६.७१ टक्के आहे. संपूर्ण निकालात मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण १.०२ टक्क्यांनी अधिक आहे.कोकण बोर्डाने स्थापना झाल्यापासून दहावी आणि बारावी या दोन्ही निकालांमध्ये आपले अव्वल स्थान कायम ठेवले आहे. त्यातही सिंधुदुर्ग जिल्ह्याने ही यशाची परंपरा कायम राखली आहे. कोकण बोर्डाची स्थापना झाल्यापासून आणि त्याआधीचे एक वर्ष कोल्हापूर बोर्ड असतानाही सिंधुदुर्ग जिल्ह्याने आपला अव्वल दर्जा कायम ठेवला होता. याहीवेळी ही परंपरा कायम आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १२ हजार ५९८ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यातील १२ हजार २८९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. एकूण निकाल ९७.५५ टक्के इतका लागला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातून २७ हजार १९ परीक्षेला बसले होते. त्यातील २५ हजार ८१५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, एकूण निकाल ९५.५४ टक्के इतका लागला आहे. रत्नागिरीपेक्षा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा निकाल २.०१ टक्क्यांनी अधिक आहे. कॉपीचे प्रमाण शून्य टक्केकोकण विभागातून एकूण ३९ हजार ६३२ विद्यार्थ्यांनी नावनोंदणी केली होती. पैकी ३९ हजार ६१७ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. मात्र, परीक्षा कालावधीत कोणताही गैरप्रकार घडलेला नाही. त्यामुळे कोकणचा निकाल कॉपीविरहित तर आहेच, शिवाय एकाही विद्यार्थ्याचा राखीव निकाल नाही, असे गिरी यांनी आवर्जून सांगितले. यावर्षीपासून गायन, संगीत, चित्रकला यांचे सवलती गुण शासनाने एकत्रित केले आहेत.१०० टक्के निकालकोकण विभागात ६२३ माध्यमिक शाळा आहेत. त्यातील २४० शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात ३९८ शाळा असून, १३१ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. २१६ शाळांचा निकाल ९० ते ९९ टक्के, ४० शाळांचा निकाल ८० ते ९०, १० शाळांचा निकाल ७० ते ८० टक्के, तर जिल्ह्यातील एकमेव शाळेचा निकाल ६० ते ७० टक्के इतका लागला आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २२५ शाळांपैकी १०९ शाळांचा निकाल १०० टक्के इतका लागला आहे. १०६ शाळांचा निकाल ९० ते ९९ टक्के इतका लागला. आठ शाळांचा निकाल ८० ते ९० टक्के, तर २ शाळांचा निकाल ७० ते ८० टक्के इतका राहिला आहे.१00 टक्के गुणरत्नागिरी जिल्ह्यातील १५ आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १२ अशा २७ विद्यार्थ्यांना १00 टक्के गुण मिळाले आहेत. यावर्षी कला क्षेत्रात काही ना काही केलेल्या विद्यार्थ्यांना सवलतीचे अधिक गुण मिळाले आहेत.विशेष गुणवत्ता मिळवलेले विद्यार्थीश्रेणीरत्नागिरीसिंधुदुर्गविशेष५,५१८३,९५८प्रथम९,८८९४,८0८द्वितीय८,४३३३,0४४तृतीय२,४२८६३0प्रमुख विषयांचा निकाल मराठी विषयाचा ९७.१३ टक्के, इंग्रजी विषयाचा ९६.९३, हिंदी विषयाचा ९७.६३, गणित विषयाचा ९६.१२, विज्ञान शाखेचा निकाल ९७.८४, इतिहास भूगोल विषयाचा निकाल ९८.६७ टक्के इतका लागला आहे.