शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३ गावे, ३९४ वाड्यांचा समावेश, पावणेपाच कोटींचा आराखडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 12:07 IST

सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्भवणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ग्रामीण पाणीपुरवठा विभाग सज्ज झाला आहे. यावर्षीचा ४ कोटी ७७ लाख रुपयांचा पाणीटंचाई निवारण आराखडा तयार करण्यात आला असून यात ३ गावे व ३९४ वाड्यांचा समावेश आहे.

ठळक मुद्देसिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३ गावे, ३९४ वाड्यांचा समावेशपावणेपाच कोटींचा आराखडा, संभाव्य पाणीटंचाई

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात उद्भवणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ग्रामीण पाणीपुरवठा विभाग सज्ज झाला आहे. यावर्षीचा ४ कोटी ७७ लाख रुपयांचा पाणीटंचाई निवारण आराखडा तयार करण्यात आला असून यात ३ गावे व ३९४ वाड्यांचा समावेश आहे.कामांची अंदाजपत्रके तातडीने तयार करा व अंतिम मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करा, असे आदेश जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत यांनी पाणीपुरवठा विभागाला दिले. जिल्हा परिषद पाणीपुरवठा व स्वच्छता समितीची सभा अध्यक्षा रेश्मा सावंत यांच्या अध्यक्षतेखाली येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात झाली.

यावेळी वित्त व बांधकाम सभापती संतोष साटविलकर, समिती सचिव तथा पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रल्हाद पाताडे, सदस्य सरोज परब, सावी लोके, संजय आंग्रे, विकास कुडाळकर, अधिकारी, खातेप्रमुख उपस्थित होते.जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता यावर्षीचा पाणीटंचाई आराखडा हा ४ कोटी ७७ लाख एवढा मंजूर करण्यात आला आहे. जिल्ह्यातील ३ गाव व ३९४ वाड्यांमध्ये पाणीटंचाई भासू शकते, असे अनुमान ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने काढले आहे.त्या अनुषंगाने नळपाणी, विंधन विहिरी, विहिरीतील गाळ काढणे आदी कामांची अंदाजपत्रके तत्काळ मागवा व जिल्ह्यातील जनतेला पाण्यासाठी भटकंती करावी लागणार नाही याची काळजी घ्या, अशी सूचना जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत यांनी करत प्राप्त होणारी अंदाजपत्रके अंतिम मान्यतेसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवा, असे आदेश दिले.१ कोटी १२ लाखांच्या कामांना मंजुरीपाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने जिल्ह्यासाठी नव्याने दहा कामांना मंजुरी दिली आहे. नळयोजनेच्या कामासाठी १६ लाख ८९ हजार व नवीन विंधन विहिरीसाठी ९५ लाख ७५ हजार असे एकूण सुमारे १ कोटी १२ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत, अशी माहिती कार्यकारी अभियंता प्रल्हाद पाताडे यांनी दिली. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गWaterपाणीcollectorतहसीलदार