शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

सिंधुदुर्ग: बांदा येथील श्री बांदेश्वराच्या दर्शनासाठी भक्तांची गर्दी, पालखी प्रदक्षिणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 19:11 IST

बांदा येथील प्रसिद्ध व जागृत स्वयंभू श्री बांदेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त हजारो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. चार दिवस चालणाऱ्या या उत्सवाला सोमवार १२ फेब्रुवारी रोजी आरंभ झाला. या सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देश्रींच्या मंदिराभोवती सवाद्य पालखी प्रदक्षिणेचा कार्यक्रम भाविकांसाठी कोकम सरबत वाटप, मंदिरावर आकर्षक रोषणाई

सिंधुदुर्ग: बांदा येथील प्रसिद्ध व जागृत स्वयंभू श्री बांदेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त हजारो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. चार दिवस चालणाऱ्या या उत्सवाला सोमवार १२ फेब्रुवारी रोजी आरंभ झाला. या सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी रात्री श्रींच्या मंदिराभोवती सवाद्य पालखी प्रदक्षिणेचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.मंगळवारी महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी सुर्योदयापासून ते दुसरे दिवशी सकाळी सुर्योदयापर्यंत ब्रम्हवृंदाच्या मंत्रोच्चारात अष्टौप्रहर श्रींवर रुद्रावर्तन व अभिषेक करण्यात आला. सकाळी ८ ते दुपारी ३ वाजेपर्यंत श्री शिवलीलामृत ग्रंथ पारायण झाले. सायंकाळी विविध मंडळांची भजने झाली. त्यानंतर शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम झाला. रात्री श्रींची मंदिराभोवती सवाद्य पालखी प्रदक्षिणा भाविकांच्या उपस्थितीत व शिवनामाच्या जयघोषात पार पडली.महाशिवरात्रीनिमित्त स्वयंभू शिवलिंगावर अभिषेक करण्यासाठी भाविकांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते नारायण पित्रे यांच्या आस्वाद कोकम तर्फे येणाºया भाविकांसाठी मोफत कोकम सरबत वाटप करण्यात आले. उत्सवानिमित्त मंदिरावर आकर्षक रोषणाई करण्यात आली होती.बुधवार १४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता श्रींची पालखी श्री देव पाटेश्वर भेटीसाठी निघली, त्यानंतर वाजत-गाजत राजमार्गाने विविध देवस्थानांकडे अभंग गायन व आरती करुन श्री बांदेश्वर मंदिराभोवती पालखी प्रदक्षिणा पार पडली.  रात्री १० वाजता इन्सुली दशावतार नाट्यमंडळ, इन्सुली यांचा भक्ती महिमा हा नाट्यप्रयोग होईल. गुरुवार १५ रोजी दुपारी १.३० ते ३ या वेळेत समाराधना होऊन या समारंभाची सांगता होईल. भाविकांनी या सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन श्री बांदेश्वर भूमिका देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.

 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गTempleमंदिर