शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
2
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
3
पगार नाही तर विमानही नाही! इंजिनिअर्सच्या संपाने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स ठप्प, प्रवाशांचे हाल
4
Robert Kiyosaki Alert: 'लाखो लोक उद्ध्वस्त होतील, एक मोठा विनाश येणार...' ‘या’ दिग्गजाचा भयानक इशारा, सुटण्याचा मार्ग काय?
5
माजी क्रिकेट प्रशिक्षकाची हत्या, हल्लेखोरांनी पत्नी आणि सुनेसमोरच झाडल्या गोळ्या  
6
प्रियकरासमोरच गाडीतून खेचत नेलं, विमानतळाजवळ सामूहिक अत्याचार; पोलिसांकडून आरोपींचा एन्काऊंटर
7
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
8
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
9
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
10
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
11
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...
12
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
13
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
14
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
15
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
16
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
17
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
18
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
19
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
20
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी

सिंधुदुर्ग : वाहतूक नियमांचा भंग करूनही वाहतूक पोलिसाशी हुज्जत, दुचाकीस्वाराची दादागिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 12:33 IST

वाहतूक नियमांचा भंग करूनही वाहतूक पोलिसाशी हुज्जत घालणे मालवण येथील चौघांना महागात पडले. भरड नाका येथे वाहतूक पोलिसांनी वाहन तपासणीसाठी थांबविले असता दुचाकीस्वार कुणाल किशोर खानोलकर (रा. भरड, मालवण) याने दादागिरी व दमदाटी करत तिघांना बोलावून आणले.

ठळक मुद्देवाहतूक नियमांचा भंग करूनही वाहतूक पोलिसाशी हुज्जत मालवण येथील चौघांना पडले महागपोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार चौघांवर गुन्हा दाखल

मालवण : वाहतूक नियमांचा भंग करूनही वाहतूक पोलिसाशी हुज्जत घालणे मालवण येथील चौघांना महागात पडले. भरड नाका येथे वाहतूक पोलिसांनी वाहन तपासणीसाठी थांबविले असता दुचाकीस्वार कुणाल किशोर खानोलकर (रा. भरड, मालवण) याने दादागिरी व दमदाटी करत तिघांना बोलावून आणले.

यावेळी मंदार कांदळकर, अनिल कांदळकर व एका अनोळखी व्यक्तीने अंगावर धावून येत हुज्जत घातली. याप्रकरणी वाहतूक पोलीस सुरजसिंह सत्यनारायणसिंह ठाकूर यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.तक्रारीनुसार ठाकूर भरड नाका येथे सकाळी ड्युटीवर आले. दुपारच्या सुमारास कुणाल किशोर खानोलकर हा दुचाकी (एमएच ०७ एए २५९५) घेऊन डबल सीट घेऊन भरड नाक्यावरून जात होता. यावेळी ठाकूर यांनी शिटी वाजवीत त्याला थांबवून दुचाकीची पाहणी केली.

दुचाकीच्या पुढील बाजूस नंबरप्लेट दिसून आली नाही. तसेच दुचाकीला साईड आरसे देखील नव्हते. त्यामुळे ठाकूर यांनी कागदपत्रे मागितली असता कुणाल याने कागदपत्रे व लायसन नसल्याचे सांगितले. त्यामुळे ठाकूर यांनी तडजोड शुल्क म्हणून २०० रुपये दंडाची पावती भरण्यास सांगितले.

यावर कुणाल याने मी पोलिसांना पैसे देतोय असे सर्वांना ओरडून सांगू लागला. तसेच दादागिरी दाखवू लागला. त्यामुळे ठाकूर यांनी पावती रद्द करून मोटार वाहन अधिनियमनुसार नोटीस देत कुणाल याच्याकडील दुचाकी ताब्यात घेतली.

अनिल कांदळकर, मंदार कांदळकर व अन्य एक व्यक्ती अशा तिघांना कुणाल नाक्यावर घेऊन आला. या तिघांनी आपल्या अंगावर धावून येत गाडी आमची असल्याचे सांगत गाडी ताब्यात घेण्याचा तुला अधिकार आहे का? आमची गाडी ताब्यात का घेतलीस? असे सांगत मारण्यासाठी हातवारे केले असे तक्रारीत म्हटले आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गtraffic policeवाहतूक पोलीस