शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : सूक्ष्म सिंचनचा आराखडा करा : दीपक केसरकर यांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2018 17:33 IST

तिलारी आंतरराज्य प्रकल्पातील पाण्याचा वापर करण्यासाठी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत दोडामार्ग व सावंतवाडी तालुक्यात सूक्ष्म जलसिंचन प्रकल्प राबविण्यासाठी ३५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

ठळक मुद्देसूक्ष्म सिंचनचा आराखडा करा : दीपक केसरकर यांचे आदेश तिलारी प्रकल्पातील पाण्याचा होणार वापर, ३५ कोटींची तरतूद

सिंधुदुर्गनगरी : तिलारी आंतरराज्य प्रकल्पातील पाण्याचा वापर करण्यासाठी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत दोडामार्ग व सावंतवाडी तालुक्यात सूक्ष्म जलसिंचन प्रकल्प राबविण्यासाठी ३५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

हा सूक्ष्म सिंचन प्रकल्प राबविण्यासाठी येत्या पंधरा दिवसांत आराखडा सादर करण्याचे निर्देश वित्त व नियोजन राज्यमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिले.तिलारी प्रकल्पात येणाऱ्या दोडामार्ग व सावंतवाडी तालुक्यात प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत सूक्ष्म सिंचन योजना राबविण्यासंदर्भात  मंत्रालयात केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या.केसरकर म्हणाले, तिलारी प्रकल्प हा आंतरराज्य प्रकल्प असून या प्रकल्पाचा फायदा शेतकऱ्यांना व्हावा यासाठी दोडामार्ग व सावंतवाडी तालुक्यातील ५६०० हेक्टर क्षेत्रात सूक्ष्म जलसिंचन प्रकल्प राबविण्यात यावा. यासाठी कृषी विभागाने आराखडा तयार करावा. तसेच या पद्धतीनेच इतर तालुक्यांत सूक्ष्म सिंचन योजना राबविण्यासाठी आराखडे तयार करून कार्यवाही करावी.या बैठकीस जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे, अधीक्षक अभियंता मिलिंद नाईक, कार्यकारी अभियंता मकरंद मॅकेल, राजेश धागतोडे, जैन सिंचनचे मधुकर फुके, आमदार वैभव नाईक आदींबरोबरच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Tilari damतिलारि धरणDeepak Kesarkarदीपक केसरकर sindhudurgसिंधुदुर्ग