शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

सिंधुदुर्ग : उपवनसंरक्षक धारेवर, सौरकुंपणाचे काम रखडले : ग्रामस्थ आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 16:28 IST

मळगाव-वेत्ये येथे सुरू असलेल्या सौरकुंपणाचे रखडलेले काम आणि गव्यांकडून शेतकऱ्यांचे होणारे नुकसान यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थ आणि सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी वनविभागाच्या कार्यालयावर धडक देत उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांना धारेवर धरले. यावेळी सौरकुंपणाचे जलदगतीने काम करण्यात येईल, अशी ग्वाही चव्हाण यांनी दिली.

ठळक मुद्देउपवनसंरक्षक धारेवर, सौरकुंपणाचे काम रखडले ग्रामस्थ, सर्वपक्षीय पदाधिकारी आक्रमक

तळवडे : मळगाव-वेत्ये येथे सुरू असलेल्या सौरकुंपणाचे रखडलेले काम आणि गव्यांकडून शेतकऱ्यांचे होणारे नुकसान यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थ आणि सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी वनविभागाच्या कार्यालयावर धडक देत उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांना धारेवर धरले. यावेळी सौरकुंपणाचे जलदगतीने काम करण्यात येईल, अशी ग्वाही चव्हाण यांनी दिली.गव्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या प्रयत्नाने नरेंद्र्र डोंगराच्या पायथ्यालगत वनखात्यामार्फत सौर कुंपणाचे काम सुरू आहे. या कामासाठी ४० लाखांचा निधी मंजूर होऊन भूमिपूजनही झाले. मात्र, आठ महिने उलटले तरी काम अपूर्णावस्थेत असल्याने याबाबत ग्रामस्थांनी चव्हाण यांना जाब विचारला.मळगाव ग्रामपंचायत किंवा वन समितीला विचारात न घेता निधी खर्ची घालून बाकीची रक्कम वनसमितीच्या नावे टाकता हे कसे, शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानीला जबाबदार कोण यासह अनेक प्रश्नांचा भडिमार माजी पंचायत समिती सभापती राजेंद्र्र परब व शिवसेना तालुकप्रमुख रुपेश राऊळ यांनी केला. तर वनविभागाची मनमानी खपवून घेणार नाही, असा इशारा संजू परब यांनी दिला.यावेळी उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांनी जलदगतीने सौरकुंपणाचे काम करण्याची ग्वाही दिली. यावर ग्रामस्थांनी मंगळवारपर्यंत काम सुरू करा, अन्यथा सौर कुंपणाचे खांब आणून सावंतवाडी वनविभागात जमा करू, असा इशारा दिला.यावेळी स्वाभिमान पक्षाचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष संजू परब, माजी पंचायत समिती सभापती राजेंद्र्र परब, शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, दिलीप सोनुर्लेकर, दाजी सावंत, नीलेश कुडव, हनुमंत पेडणेकर, गुरुनाथ गावकर, सावंतवाडी नगरसेवक सुधीर आडिरवरेकर तसेच शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कंत्राटदार कोल्हापूरचाआतापर्यंत दहा लाख रुपये संबंधित कंत्राटदाराला देण्यात आले आहेत. असे असूनही काम अपूर्णावस्थेत का? हे काम सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असताना कंत्राटदार मात्र कोल्हापूरचा कसा, असे सवाल मळगाव ग्रामस्थांनी उपस्थित केले. मात्र, यावर समर्पक उत्तर न देता आॅनलाईन टेंडर होते असे सांगून उपवनसंरक्षक चव्हाण यांनी हात वर केल्याने ग्रामस्थ संतप्त झाले. 

टॅग्स :forest departmentवनविभागsindhudurgसिंधुदुर्ग