शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : मोंड पूल जोडरस्ता जागा भूसंपादन प्रक्रिया व्हावी, ग्रामस्थांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 14:45 IST

मोंड-वानिवडे पुलाच्या जोडरस्त्याला शेतकऱ्यांची जमीन संपादित होणार असून या जमिनीला शासकीय दराप्रमाणे भाव देत मोबदला देण्यात यावा. पुलाच्या किंवा जोडरस्त्याच्या कामाला आमचा विरोध नाही. हा पूल येथील ग्रामस्थांना महत्त्वपूर्ण आहे. शासनाकडून भूसंपादनाची प्रक्रिया राबविण्यात यावी, अशी मागणी माजी आमदार तथा भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांच्याकडे करण्यात आली.

ठळक मुद्देमोंड पूल जोडरस्ता जागा भूसंपादन प्रक्रिया व्हावी, ग्रामस्थांची मागणी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांच्याशी चर्चा

देवगड : मोंड-वानिवडे पुलाच्या जोडरस्त्याला शेतकऱ्यांची जमीन संपादित होणार असून या जमिनीला शासकीय दराप्रमाणे भाव देत मोबदला देण्यात यावा. पुलाच्या किंवा जोडरस्त्याच्या कामाला आमचा विरोध नाही. हा पूल येथील ग्रामस्थांना महत्त्वपूर्ण आहे. शासनाकडून भूसंपादनाची प्रक्रिया राबविण्यात यावी, अशी मागणी माजी आमदार तथा भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांच्याकडे करण्यात आली.जठार यांनी मोंड-वानिवडे पुलाच्याबाबत मोंड व वानिवडे येथील ग्रामस्थांशी ग्रामपंचायत कार्यालय मोंड येथे भेट देऊन चर्चा केली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य गणेश राणे, जयंत बापट, अभय बापट, प्रसाद कुळकर्णी, भाजपा तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर, पंचायत समिती सदस्य रवी तिर्लोटकर, वाघोटण सरपंच कृष्णा आमलोसकर तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.मोंड-वानिवडे पुलाच्या कामाला मंजुरी प्राप्त झाली हे चांगले झाले. गेली २० ते २२ वर्षे या पुलाच्या मागणीसाठी येथील ग्रामस्थ प्रयत्न करीत होते. त्यामुळे पुलाच्या कामाला किंवा जोडरस्त्याला आमचा अजिबात विरोध नाही. जोडरस्ता हा भूसंपादनामध्ये नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

भूसंपादन नसेल तर रस्त्याला येथील गरीब शेतकऱ्यांची जमीन जाणार आहे. त्याच्या शेतीच्या होणाऱ्या नुकसानीचा लाभ हा शासनाकडून प्राप्त झाला पाहिजे. त्यासाठी भूसंपादन प्रक्रिया करण्यात यावी. तरच येथील बाधीत जमीनदारांना योग्य मोबदला प्राप्त होऊ शकतो. शासकीय दराप्रमाणेच येथील बाधीत शेतकऱ्यांना मोबदला हीच दोन्ही गावातील ग्रामस्थांची मागणी आहे, असे मत उपस्थित ग्रामस्थांनी जठार यांच्याकडे मांडले.यावेळी जठार यांनी ग्रामस्थांची मागणी योग्य असून सार्वजनिक बांधकाम विभागाला नियमानुसार जोडरस्त्याला जाणाऱ्यां जमिनीचे भूसंपादन करण्यात यावे अशाप्रकारची सूचना केली जाईल. हा प्रस्ताव तातडीने शासनाकडे पाठविण्यात यावा असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता चौंडे यांना सांगण्यात आले.या पुलाच्या कामाला सुमारे ७ कोटी ५३ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामाची निविदा प्रक्रिया सुरु असून पावसाळ्यानंतरच या कामाला प्रत्यक्ष सुरुवात केली जाईल, असेही जठार यांनी सांगितले.मोंड प्राथमिक आरोग्य केंद्राला भेटमोंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत सुसज्ज बांधण्यात आली आहे. अशाप्रकारची इमारत संपूर्ण जिल्ह्यात नाही. इमारतीचे बांधकामही चांगल्याप्रकारे करण्यात आल्याचे जठार यांनी आरोग्य केंद्राला भेट दिली त्यावेळी मत व्यक्त केले. इमारत आकर्षक व सुसज्ज असताना येथे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी वर्ग नाही. यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. त्यामुळे राष्ट्रीय आरोग्य योजनेंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदे भरण्यात यावीत अशी मागणी शासनाकडे करण्यात येईल, असेही जठार म्हणाले. 

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभागsindhudurgसिंधुदुर्गBJPभाजपाPramod Jatharप्रमोद जठार