शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : रत्नागिरी-सिंधुदुर्गमधील डीएड, बीएडधारक एकवटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 17:01 IST

शिक्षक भरती सुरू करा, शासकीय नोकर भरतीमध्ये रत्नागिरी जिल्ह्याप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ७० टक्के स्थानिकांना प्राधान्य द्या यासह अन्य मागण्यांच्या पुर्ततेसाठी सिंधुदुर्ग - रत्नागिरी जिल्हा डी.एड, बी.एड धारक संघटनेच्या शेकडो बेरोजगारांनी आक्रमक भूमिका घेत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढत प्रशासनाचे लक्ष वेधले.

ठळक मुद्देरत्नागिरी-सिंधुदुर्गमधील डीएड, बीएडधारक एकवटलेभावी शिक्षक नोकरीसाठी पेटून उठला शेकडो बेरोजगारांचा मोर्चा

सिंधुदुर्गनगरी : शिक्षक भरती सुरू करा, शासकीय नोकर भरतीमध्ये रत्नागिरी जिल्ह्याप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ७० टक्के स्थानिकांना प्राधान्य द्या यासह अन्य मागण्यांच्या पुर्ततेसाठी सिंधुदुर्ग - रत्नागिरी जिल्हा डी.एड, बी.एड धारक संघटनेच्या शेकडो बेरोजगारांनी आक्रमक भूमिका घेत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढत प्रशासनाचे लक्ष वेधले.

भिक नको-न्याय द्या..., पोरा आमची शाळा आमची-शिक्षक कित्या भायलो यासह विविध घोषणा देत सिंधुदुर्गनगरी दणाणून सोडली. यावेळी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.राज्य शासनाने २०१० पासून आजमितीपर्यंत शिक्षक भरती प्रक्रिया राबविलेली नाही. परिणामी स्थानिकांसह राज्यभरातील लाखो डी.एड, बीएड धारक उमेदवार बेरोजगार राहिले आहेत. म्हणूनच या अन्यायाविरोधात मंगळवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेकडो बेरोजगार उमेदवारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत आपल्या सर्व मागण्या मान्य करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी संघटनेचे अध्यक्ष भिवसेन मसुरकर, उपाध्यक्ष भाग्यश्री रेवडेकर, सचिव लखू खरवत, रश्मी गोसावी यासह शेकडो उमेदवार उपस्थित होते.२०१० साली सिंधुदुर्ग जिल्ह्यात ५८९ जागांसाठी शिक्षक भरती करण्यात आली होती. यात स्थानिकांना डावलण्यात आले होते. जिल्ह्यातील केवळ २६ उमेदवार शिक्षक झाले. उर्वरित ५६३ उमेदवार विदर्भ, मराठवाडा येथील होते.जिल्हास्तरावरील होणारी भरती कालांतराने राज्यस्तरावरून झाल्याने याचा फटका कोकणातील तरूणांना बसला. त्यामुळे स्थानिक तरूण नोकरीच्या प्रवाहातून बाहेर फेकले गेले. परिणामी हे तरूण रस्त्यावर उतरले. आंदोलन, उपोषण झाली. मोर्चे काढण्यात आले. परंतु आश्वासनांपलिकडे हाती काहीच लागले नव्हते....या आहेत प्रमुख मागण्याशिक्षक भरतीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक डीएड, बीएड धारकांना ७0 टक्के प्राधान्य द्यावे, कोकण निवड मंडळाची पुनर्स्थापना करावी, शासकीय नोकरीत स्थानिकांना ७0 टक्के प्राधान्य देण्यात यावे असा जिल्हा परिषदेचा ठराव संमत करून शासनाला सादर करण्यात यावा.

आंतरजिल्हा बदल्यांमुळे विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी तसेच स्थानिक बेरोजगारी कमी करण्यासाठी स्थानिक डीएड, बीएड धारकांना शिक्षक भरतीत प्राधान्य द्यावे, टीईटी व अभियोक्ता परीक्षा रद्द करावी. सन २0१0 सारखे विदर्भ-मराठवाड्यातील शिक्षकांचे पुनर्वसन कोकणात नको, जिल्ह्यातील शिक्षक भरतीला डोंगरी निकषातून आरक्षण मिळावे. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गTeacherशिक्षक