शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : करुळ घाटात साईडपट्टीला भेगा, लोरेत घराच्या छप्पराचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 17:03 IST

वैभववाडी तालुक्यात रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे करुळ घाटाच्या मध्यावर नव्याने बांधलेल्या संरक्षक कठड्यालगत साईडपट्टीला मोठ्या भेगा पडल्या आहेत. तर भुईबावडा-तळीवाडी येथील सार्वजनिक विहीर कोसळली आहे.

ठळक मुद्देकरुळ घाटात साईडपट्टीला भेगा, लोरेत घराच्या छप्पराचे नुकसान अतिवृष्टीमुळे भुईबावडा तळीवाडीतील विहीर कोसळली

सिंधुदुर्ग : वैभववाडी तालुक्यात रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे करुळ घाटाच्या मध्यावर नव्याने बांधलेल्या संरक्षक कठड्यालगत साईडपट्टीला मोठ्या भेगा पडल्या आहेत. तर भुईबावडा-तळीवाडी येथील सार्वजनिक विहीर कोसळली आहे. तसेच लोरे डोंगरेवाडीत घराच्या छप्पराचे नुकसान झाले आहे. दरम्यान रविवारी पडलेल्या पावसाची १२० मिलीमीटर एवढी नोंद झाली आहे.शनिवारी मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाने तालुक्याला झोडपून काढले होते. रविवारी सायंकाळपासून पावसाचा जोर ओसरला. परंतु, मुसळधार पावसामुळे करुळ घाटातील यंदा बांधलेल्या संरक्षक कठड्याजवळ साईडपट्टीला सुमारे २५-३० फूट लांब भेगा पडल्या आहेत. त्यामुळे त्याठिकाणी पावसाळ्यात रस्ता खचण्याची शक्यता निर्माण झाली आहे.पावसाळ्याच्या सुरुवातीलाच घाटातील नव्याने बांधलेल्या संरक्षक कठड्यांच्या बांधकामांची अशी स्थिती झाल्याने घाटातील कामांच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तसेच भुईबावडा तळीवाडी येथील पिण्याच्या पाण्याची दगडी बांधकाम असलेली सार्वजनिक विहीर पूर्णपणे कोसळली आहे. त्या

मुळे भविष्यात तेथील जनतेची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे. अतिवृष्टीत झालेल्या वादळामुळे लोरे डोंगरेवाडी येथील लक्ष्मण तुकाराम डोंगरे यांच्या घराच्या छप्पराचे पत्रे उडाल्याने ३ हजार ५०० रुपयांचे नुकसान झाले आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गmonsoon 2018मान्सून 2018