शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

सिंधुदुर्ग : पाडलोस-हवालदारवाडीत गव्यांचा संचार, परिसरात पुन्हा पिकांचे केले नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 15:42 IST

पाडलोस-हवालदारवाडी येथे आपल्या बागायतीत गेलेले मोहन गावडे यांच्या अंगावर गवा धावून आल्याची घटना शुक्रवारी संध्याकाळी ६ वाजता घडली. गावडे यांनी हुशारीने प्रसंगावधान राखून तेथून पळ काढला. भरवस्तीत गव्यांचा संचार असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

ठळक मुद्देपाडलोस-हवालदारवाडीतील घटना पुन्हा एकदा परिसरात पिकांचे केले नुकसान गव्याचा ग्रामस्थावर हल्ला

बांदा : पाडलोस-हवालदारवाडी येथे आपल्या बागायतीत गेलेले मोहन गावडे यांच्या अंगावर गवा धावून आल्याची घटना शुक्रवारी संध्याकाळी ६ वाजता घडली. गावडे यांनी हुशारीने प्रसंगावधान राखून तेथून पळ काढला. भरवस्तीत गव्यांचा संचार असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.वन्यप्राण्यांचा भरवस्तीत वावर वाढला आहे. मोहन गावडे संध्याकाळी आपल्या काजू बागायतीत गेले असता अचानक गवा समोर आला. गावडे यांनी तेथून पळ काढला व याची खबर संतोष आंबेकर यांना दिली. आंबेकर यांनी ग्रामस्थांना जमवून त्या गव्याला हुसकवण्याचा प्रयत्न केला. परंतु तो गवा पुन्हा पुन्हा ग्रामस्थांच्या अंगावर धावून येऊ लागला.

सुमारे अर्ध्या तासांच्या अथक प्रयत्नांती दहा ते बारा ग्रामस्थांनी त्या गव्याला जंगलाच्या दिशेने पळवून लावले. यावेळी दिलीप आईर, प्रतीक्षा करमळकर, प्रसाद करमळकर, सुभाष करमळकर, कविता आंबेकर, प्रकाश गावडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.दरम्यान, मडुरा गावात गव्यांनी पिकांची नासधूस केल्याची घटना ताजी असताना आज रात्री पुन्हा एकदा पाडलोसमध्ये मिरची, मका, फजाव, चळवळीचे गव्यांनी नुकसान केले. पाडलोस उपसरपंच महादेव गावडे तसेच तुकाराम शेटकर, हर्षद गावडे यांच्या पिकांचे नुकसान केले.

गव्यांच्या वारंवार होणाऱ्या उपद्रवावर वनविभागाने वेळीच उपाययोजना न केल्यास तालुक्यातील शेतकरी, बागायतदारांसमवेत वनविभाग कार्यालयावर धडकणार असल्याचे शिवसेना उपतालुकाप्रमुख राजू शेटकर यांनी सांगितले. 

आवश्यक त्यावेळी वनविभाग नॉटरिचेबल किंवा फोन उचलत नसल्याने शेटकर यांनी नाराजी व्यक्त केली व याकडे उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांचे लक्ष वेधणार असल्याचे सांगितले. दरम्यान, वनविभागाशी संपर्क साधला असता प्रत्यक्ष जाग्यावर जाऊन पाहणी करणार असल्याचे अमित कटके यांनी सांगितले.तो गवा जखमी; गस्त ठेवण्याची मागणीपाडलोस, मडुरा, रोणापाल गावात फिरणाऱ्या गव्यांच्या कळपात एक गवा जखमी अवस्थेत असल्याची चर्चा आहे. काल सायंकाळी पाडलोस हवालदारवाडी येथे आलेला गवा जखमी असावा. जर गवा जखमी असेल तर त्यावर वनविभागाने उपचार करण्याची गरज आहे. तसेच शेतकरी, बागायतदारांसाठी मडुरा व पाडलोसमध्ये वनविभागाने कायम गस्त ठेवण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गforestजंगल