शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदूर्ग : आधी बेकायदेशीर धंदे बंद करा, पोलिसांना ठणकावले, शिवसेनेने घातला प्रभारी निरीक्षकांना घेराओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 16:57 IST

दोडामार्ग : खडी वाहतूक करणाऱ्या स्थानिक युवकांच्या डंपरवर पोलिसांनी केलेली कारवाई ही बेकायदेशीर असल्याचा आरोप करीत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी प्रभारी पोलीस निरीक्षक योगेश जाधव यांना घेराओ घातला. डंपर अडवून त्यांच्यावर कारवाई करण्याचा अधिकार पोलिसांना कोणी दिला, असा सवाल उपस्थित करीत प्रथम पोलिसांनी तालुक्यात बेकायदा सुरू असलेले दारूधंदे बंद करावेत. नको त्या उचापती करू नयेत, असे ठणकावून सांगितले.

ठळक मुद्देआधी बेकायदेशीर धंदे बंद करा, पोलिसांना ठणकावले शिवसेनेने घातला प्रभारी निरीक्षकांना घेराओ

दोडामार्ग : खडी वाहतूक करणाऱ्या स्थानिक युवकांच्या डंपरवर पोलिसांनी केलेली कारवाई ही बेकायदेशीर असल्याचा आरोप करीत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी प्रभारी पोलीस निरीक्षक योगेश जाधव यांना घेराओ घातला.

डंपर अडवून त्यांच्यावर कारवाई करण्याचा अधिकार पोलिसांना कोणी दिला, असा सवाल उपस्थित करीत प्रथम पोलिसांनी तालुक्यात बेकायदा सुरू असलेले दारूधंदे बंद करावेत. नको त्या उचापती करू नयेत, असे ठणकावून सांगितले.दोडामार्ग तालुक्यातून गोव्यात मोठ्या प्रमाणात खडी वाहतूक केली जाते. काही स्थानिक युवकांचे डंपर या व्यवसायात आहेत. गुरूवारी सकाळी स्थानिकांचे काही डंपर दोडामार्गमार्गे गोव्यात खडी घेऊन जात होते. यावेळी पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र गुरव यांनी हे डंपर अडवून ते कारवाईसाठी ताब्यात घेतले.  पोलिसांनी सोमवारी सकाळी ही कारवाई केली. त्यांनी याबाबत सेनेचे तालुकाप्रमुख तथा पंचायत समिती सदस्य बाबुराव धुरी यांच्याकडे आपले गाऱ्हाणे मांडले.

संतापलेल्या सेना पदाधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत प्रभारी पोलीस निरीक्षक योगेश जाधव यांना घेराओ घालत जाब विचारला. तालुक्यात राजरोसपणे दारूधंदे सुरू आहेत. ते पोलिसांनी प्रथम बंद करावेत. स्थानिकांच्या रोजगाराच्या आड येऊ नये, असे ठणकावून सांगितले. त्यानंतर ज्यांच्याकडे खडी वाहतुकीचा परवाना होता ते डंपर सोडून देण्यात आले तर उर्वरितांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गPoliceपोलिस