शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : मुख्यमंत्र्यांनी केसरकरांचीच ओढली री, गोव्यात महात्मा फुले आरोग्यदायी योजनेतूनच रुग्णसेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 17:02 IST

गोवा सरकारने बांबुळीतील वैद्यकीय महाविद्यालयातील मोफत सेवा बंद केल्यानंतर गेला आठवडाभर सिंधुदुर्गमध्ये सुरू असलेल्या जनआक्रोशच्या पार्श्वभूमीवर गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांनी केसरकरांचीच ओढली रीगोव्यात महात्मा फुले आरोग्यदायी योजनेतूनच रुग्णसेवा  देवेंद्र फडणवीस, विश्वजित राणे यांची मुंबईत झाली बैठक

सावंतवाडी : गोवा सरकारने बांबुळीतील वैद्यकीय महाविद्यालयातील मोफत सेवा बंद केल्यानंतर गेला आठवडाभर सिंधुदुर्गमध्ये सुरू असलेल्या जनआक्रोशच्या पार्श्वभूमीवर गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत मात्र मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्र्यांचीच री ओढत महात्मा फुले आरोग्यदायी योजना गोव्याच्या मेडिकल कॉलेजला देण्याचे सुतोवाच केले आहे. तसेच या बैठकीत त्यावर एकमतही घडवून आणण्यात आले आहे.सिंधुदुर्गातील रुग्णांना गोव्यात मोफत रुग्णसेवा देण्यात यावी या मागणीसाठी दोडामार्ग, सावंतवाडी तसेच कुडाळ येथे सर्वपक्षीयांचे जनआक्रोश आंदोलन सुरू आहे. दोडामार्गमधील आंदोलनाने तर उग्र रुप धारण केले आहे. त्यामुळे यावर तातडीने तोडगा निघाला पाहिजे यासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, माजी आमदार राजन तेली, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र म्हापसेकर यांच्यासह शिवसेनेचे खासदार विनायक राऊत, अरुण दुधवडकर हे आपल्या पातळीवर प्रयत्न करीत आहेत. पण त्यांना यश येत नाही.

आठवड्यापूर्वी राज्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी आंदोलकांची भेट घेतली व गोवा सरकारला वर्षाला दोन कोटी रुपये देण्याचे जाहीर केले आहे. तसेच महात्मा फुले आरोग्यदायी योजनाही राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे सांगितले. पण जनआक्रोश समिती हे ऐकण्यास तयार नव्हती. ते मोफत रुग्णसेवा द्या अशी मागणी घेऊन बसले होते. त्यांनी गेले आठवडाभर आंदोलनही सुरू ठेवले आहे.दरम्यान, गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या आदेशानंतर गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीवेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सिंधुदुर्गमधील रुग्णांना मोफत रुग्णसेवा द्या. तुम्हांला महात्मा फुले आरोग्यदायी योजनेच्या माध्यमातून होणारा खर्च देण्यात येईल, असे सांगितले. तसेच याची अंमलबजावणी तत्काळ करण्यात येणार, असेही सांगितले. गोव्याचे आरोग्यमंत्री राणे यांनीही याला होकार देत पुन्हा रुग्णसेवा देण्याचे मान्य केले आहे.मंत्री दीपक केसरकर यांनीही गोव्यातील आरोग्यसेवा बंद केल्यानंतर महात्मा फुले आरोग्यदायी योजनेच्या माध्यमातून गोव्याला पैसे देण्याचे मान्य केले होते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनीही आता मंत्री दीपक केसरकर यांचीच री ओढत यावर एकमत असल्याचे दाखवून दिले आहे. त्यामुळे गोव्याची वार्षिक ५ कोटी देण्याची अटही आता मागे पडली आहे. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गhospitalहॉस्पिटलHealthआरोग्यgoaगोवा